“चेंबूरमध्ये भिंत कोसळून, विक्रोळीत घर कोसळल्याने जीवितहानी झाली. काही जखमी झाले. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!आम्ही बोललो की राजकारण करतो, असे म्हणाल, परंतु पावसाळा आला की, असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार आहेत? प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या घटना घडत आहेत!” असं म्हणत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई मनपावर निशाणा साधला आहे. तसेच,“अतिवृष्टी आणि दरडी कोसळणे, घरं कोसळणे यापासून मुंबईकरांना वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे.” असंही दरेकर यांनी बोलून दाखवलं आहे.
चेंबूरमध्ये भिंत कोसळून,विक्रोळीत घर कोसळल्याने जीवितहानी झाली.काही जखमी झाले. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!
आम्ही बोललो कि राजकारण करतो, असे म्हणाल, परंतु पावसाळा आला कि, असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार आहेत?
प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या घटना घडतायत!— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 18, 2021
मुंबईत काल (शनिवार) पावसाने अक्षरशा थैमान घातलं. तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडली. चेंबूर भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला, तर विक्रोळीतही ३ लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमावर प्रवीण दरेकर यांनी मुंबई मनपावर निशाणा साधला.
अतिवृष्टी आणि दरडी कोसळणे, घरं कोसळणे यापासून मुंबईकरांना वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे. @mybmc @CMOMaharashtra pic.twitter.com/bpTikH7qMa
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 18, 2021
या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “मला वाटतयं महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा पूर्ण पाऊस पडला तेव्हा मी देखील सर्व ठिकाणी गेलो व तेव्हाच मागणी केली की आतातरी महापालिकेने जागं होऊन, मुंबईला तुंबई होण्यापासून वाचवावं. दुर्दैवाने तशाप्रकारची कार्यवाही झाली नाही आणि आज आपण पाहतो आहोत की मुंबई पूर्ण पाण्याखाली गेली.”
काळरात्र! चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार; तर विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली, ६ जणांचा मृत्यू
तसेच, “दरडी कोसळण्याची भीती देखील व्यक्त केली होती. आज त्या ठिकाणी नाहक अनेक निष्पापांचा जीव गेला. मला वाटतं आपला गवगवा करत असताना महापालिकेने, ज्या पद्धतीने बारकाईने लक्ष घालण्याची आवश्यकता होती, ते झालं नाही. परिणामी अनेकांना आपला जीव गमावावा लागला. आज पाण्याखाली गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले. मला वाटतं त्यांना मदत तर केली पाहिजे, ती होईलही परंतु गेलेले निष्पाप जीव कुठून आणणार. आता तरी या दुर्घटनेपासून बोध घेत, तत्काळ आठवडाभर युद्धपातळीवर प्रयत्न करत या सर्व गोष्टींपासून मुंबईकरांना वाचवण्याची आवश्यकता आहे. ही मागणी सरकार व महापालिकेकडे मी करतो.” असंही प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.