शहरीकरणाचा वाढता वेग थांबवणे आपल्याला शक्य नाही. उलट, पुढच्या पंधरा वर्षांंत ६५ टक्क्याने शहरीकरण वाढणार असून, त्याची मोठी जबाबदारी भारत, चीनसह अन्य आशियाई देशांवर राहणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने नागरीकरणाचे नियोजन झाले पाहिजे. कमीत कमी ऊर्जा वापरून माणसाची क्रयशक्ती वाढवणे, राहणीमानाचा निर्देशांक वाढवणे, पर्यावरण संवर्धन हे उद्देश समोर ठेवून यापुढे शहरांचे नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अंतिमत: तुमच्या आनंदाचा निर्देशांक हा तुमच्या आजूबाजूचे वातावरण किती चांगले आहे यावर अवलंबून असतो. त्यामुळे नागरीकरण होणारच ते सुखकारक कसे होईल, याचा विचार करून नियोजन होईल, असे आश्वासन ‘शहर आणि पर्यावरण’ या विषयावरील दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील परिसंवादातून ‘पुणे प्रदेश शहर विकास प्राधिकरणा’चे आयुक्त महेश झगडे यांनी दिले.
‘शहर आणि पर्यावरणा’चा विचार करताना शहरातील ६० टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते हे लक्षात घेतले पाहिजे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्यासारखे वेगळे मार्ग शोधले पाहिजेत, असे मत प्रा. विद्याधर वालावलकर यांनी व्यक्त केले. तर शहरांचे पर्यावरण अबाधित राखून विकासाचे नियोजन करताना शहरातील पुरातन वास्तू, नद्या, नद्यांचे घाट, डोंगर आणि डोंगरउताराकडचा भाग यांना वगळून विकासकामे झाली पाहिजेत, असा मुद्दा अभ्यासक सुजित पटवर्धन यांनी मांडला. तर ‘प्रकाश प्रदूषण’ ही नवीन संकल्पना खगोल मंडळ संस्थेचे समन्वयक अभय देशपांडे यांनी मांडली. दिव्यांच्या झगमगाटाच्या हव्यासापायी प्रकाश प्रदूषण होत असून त्यामुळे आकाशाची प्रत खाली घसरत चालली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘कचरा निर्मिती करता, तर विल्हेवाटही आवश्यक’!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा