राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी बुधवारी मुंबईत केली. सहकारी साखर कारखान्यांची विक्री थांबविण्यासाठी आणि साखर कारखान्याच्या विक्रीतील घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी झालेल्यांपुढे बोलताना हजारे यांनी राज्यातील राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, साखर कारखान्यांच्या विक्रीची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. सरकारच्या समित्यांकडून होणाऱया चौकशीवर आमचा विश्वास नाही. त्या केवळ एक फार्स असतात. आतापर्यंत कितीतरी समित्यांचे अहवाल धूळ खात पडले आहेत. जर या कारखान्यांच्या विक्रीची न्यायालयीन चौकशी झाली, तर अनेक राजकारणी लालूप्रसाद यादवांसारखे तुरुंगात जातील.
अण्णा हजारे यांनी यावेळी सहकारमंत्र्यांवरही टीका केली. सहकारमंत्र्यांनी सगळं सहकार खातं मोडकळीला आणलं. त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा