चारही राज्यात काँग्रेसला धोबीपछाड मिळाल्याने लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. परंतु योग्यवेळी आम्ही पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषीत करू. लोकांनी त्याची चिंता करू नये, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली. त्या म्हणाल्या की, चारही राज्यात काँग्रेस पिछाडीवर राहिल्याने आम्ही अत्यंत निराश झालो आहोत. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. पण यानिमित्ताने आम्ही का चुकलो, कुठे चुकलो याचा शोध घेवू. त्या म्हणाल्या की, आम्ही निवडणुका कोणत्या पद्धतीने लढवल्या, यावरही चिंतन करावे लागेल. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, पारंपारिक पद्धतीने प्रचार करणाऱ्या भाजप व काँग्रेसला आम आदमी पक्षापासून धडा घ्यावा लागेल. आमची कामगिरी आम्ही सुधारू. काँग्रेसमध्ये मोठे बदल झालेले दिसतील, असे सूचक वक्तव्य राहुल गांधी यांनी यावेळी केले. दरम्यान,विधानसभांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पत्कराव्या लागलेल्या पराभवाचे खापर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरच फोडू नये तर तो सामूहिक पराभव आहे आणि पक्ष त्याबाबत आत्मचिंतन करील, असे केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांनी म्हटले आहे.काँग्रेस पक्ष हा एकखांबी तंबू नाही त्यामुळे हा सामूहिक पराभव आहे, असेही त्या म्हणाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा