गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. मात्र, असे असले तरी विदयार्थ्यांचे बालपण हरवले जाणार नाही, याची काळजी आपण शालेय शिक्षण मंत्री म्हणून निश्चितच घेऊ, असे सांगत पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी झालेले असेल, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विलेपार्ले (पूर्व) येथील पार्ले टिळक विदयालयातील मराठी, इंग्रजी आणि महापालिकेच्या दीक्षित प्राथमिक मराठी शाळेला भेट दिली. या भेटीत त्यांनी शालेय विदयार्थ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर विद्यार्थी शाळेत घेऊन आलेले दप्तर किती जड आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष वजनकाट्यावर वजन करून तपासले. या पाहणीत दप्तराचे वजन सरासरी ४ ते ६ किलो इतके असल्याचे त्यांना आढळले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचेही वजन काट्यावर वजन करून पाहिले. विद्यार्थ्यांच्या वयाच्या तुलनेत दप्तराचे ओझे निश्चितच जास्त असल्याचे त्यांना या पहाणीत आढळून आले. शालेय विदयार्थ्यांचे पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी आपण तातडीने पावले उचलणार असल्याचे सांगत, यासाठीच आपण प्रत्यक्ष शाळांना भेट देत आहोत आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितेल.
शिक्षण मंडळाच्या अधिकाराचा घोळ वाढला
तावडे म्हणाले, राज्य शासनामार्फत शालेय विदयार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती विदयार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, याबाबत उपाययोजना करणार आहे. महाराष्ट्रातही तामिळनाडूच्या धर्तीवर तीन सत्रांत परीक्षा आणि त्यानुसार अभ्यासक्रम आखणी करणे शक्य आहे का, हेही तपासले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्व भाषा एकत्र आणि गणित, विज्ञान अशी विभागणी करता येईल का, शाळेत विविध विषयांच्या तासांचे जे वेळापत्रक आहे ते बदलता येऊ शकेल का, एकाच दिवशी विषयानुसार विभागणी करुन जास्त वेळचे तास करता येतील का, पुस्तकांचे चाचणीनिहाय विभाजन, सर्व विषयांची दर तिमाही अभ्यासक्रमानुसार परीक्षा, याबाबतही विचार करण्यात येईल असे तावडे म्हणाले.
सव्वा लाख विद्यार्थ्यांना दिलासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा