मराठी चित्रपटांसाठी दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत मागणीप्रमाणे मल्टिप्लेक्समधील शो उपलब्ध करून दिले जातील, अशी हमी गुरुवारी चित्रपटगृहमालकांनी राज्य सरकारला दिले. मराठी चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृहचालकांची बैठक गुरुवारी दुपारी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत विधान भवनात झाली. त्यानंतर या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल माहिती देण्यात आली.
मल्टिप्लेक्समध्ये ‘प्राइम टाइम’मध्ये मराठी चित्रपट दाखवणे हे २०१०च्या सरकारी आदेशानुसार बंधनकारक आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली होती. मात्र, मराठी चित्रपट प्राइम टाइमला दाखवले जात असले तरी सायंकाळी ६ आणि ९ ची वेळ मराठी चित्रपटांसाठी देण्यास मल्टिप्लेक्सकडून टाळाटाळ केली जाते, ही वेळ मराठी चित्रपटांना मिळायला हवी, अशी मागणी मराठी निर्माता-दिग्दर्शकांनी केली आहे. तावडे यांच्या निर्णयाचे मराठीजनांकडून स्वागत करण्यात आले होते. तर बॉलिवूडमधील काही जणांनी त्यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी चित्रपटगृहमालक, मराठी चित्रपट निर्माते आणि तावडे यांची बैठक झाली.
सरकारच्या २०१०च्या आदेशानुसार मल्टिप्लेक्समध्ये दुपारी १२, ३ सायंकाळी ६ आणि रात्री ९ या सर्व प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक आहे. मराठी प्रेक्षक हे प्रामुख्याने दुपारीच चित्रपट पाहणे पसंत करतात. रात्रीच्या खेळांना मराठी प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद नसतो. त्यामुळे या वेळेत मराठी चित्रपट कमी दाखवले जातात, असा युक्तिवाद चित्रपटगृहचालकांनी केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा