आता एकत्र आलोय, एकत्रितरित्या जनतेची सेवा करू आणि महाराष्ट्रातील शेतकऱयाच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी दिली. फडणवीस मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात विधानभवन प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर ते बोलत होते. शिवसेनेच्या दहा आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.विद्यासादर राव यांनी मंत्रीपद आणि गोपनियतेची शपथ दिली. यामध्ये रामदास कदम यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला दहा मंत्रिपदे आली असून यामध्ये पाच कॅबिनेट तर पाच राज्यमंत्रीपदांचा समावेश आहे.
शपथविधी सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी आता युती झाल्याने पुढील पाच वर्षांत राज्यात चांगली कामे होतील असे मत मांडले. तसेच आता एकत्रितरित्या राज्यातील विकासकामे मार्गी लावू, असेही कदम पुढे म्हणाले. कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचेही कदम यांनी आभार मानले.
व्हिडिओ: एकत्र आलोय, आता एकत्रितरित्या जनतेची सेवा करु- रामदास कदम
आता एकत्र आलोय, एकत्रितरित्या जनतेची सेवा करू आणि महाराष्ट्रातील शेतकऱयाच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी दिली.
First published on: 05-12-2014 at 06:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will work together for maharashtra development says ramdas kadam