आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत निश्चलनीकरणाने अधिक भर घातली. पायाभूत सुविधा, कंपन्यांचे तिमाही वित्तीय निष्कर्ष याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून असलेली मरगळ या कालावधीत महागाई कमी होऊनही झटकली गेली नाहीच. निस्तेज निर्मिती क्षेत्रातील हालचाल थंड बस्त्यात राहिली. स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू, विद्युत उपकरणे, वाहन असे अप्रत्यक्ष परिणाम होणारे घटकांवर चिंतेची काजळी पसरली.
भारतात ६८ टक्क्यांहून व्यवहार हे रोखीने होतात. तेव्हा खास सेवा क्षेत्रावरील परिणाम विपरीत राहिला. माहिती तंत्रज्ञान, नवउद्यम, बँकांसारख्या क्षेत्रात काहीसा उत्साहाचा कालावधी राहिला. रद्द केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाळगणाऱ्यांचे प्रमाण देशात एकूण लोकसंख्येच्या केवळ ५ टक्केच आहे.
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात निम्म्याहून अधिक सेवा क्षेत्राचा वाटा आहे. ते अधिकतर असंघटित स्वरूपातच आहे. भारताच्या आर्थिक विकास दराबद्दल सरकार स्तरावरून यापूर्वी चिंता व्यक्त केली गेली आहे. मान्सून चांगला झाला असला तरी वायदा वस्तूंच्या किमतीतील कमालीचा चढ-उतारांमुळे कृषी उत्पादनाच्या मागणी व निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकूण आर्थिक वर्षांसाठीचा विकास दर ७ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता असताना निश्चलनीकरणामुळे चालू तिमाहीचे सकल राष्ट्रीय उत्पादन ६.५ टक्केच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. औद्योगिक उत्पादन तसेच आयात-निर्यातीतही यंदा फारशी उल्लेखनीय कामगिरी राहण्याची शक्यता नाही. निश्चलनीकरणात बँकांकडे मोठय़ा प्रमाणात निधी ओघ आला असला तरी पतपुरवठा वा कर्ज वगैरेसाठीची मागणी मात्र या दरम्यान रोडावली. ठेवींमध्ये १५.९ टक्क्यांची वाढ झाली असतानाच पतपुरवठा मात्र वार्षिक तुलनेत एकटय़ा नोव्हेंबरमध्ये अवघ्या ६.६ टक्क्यांनीच वाढला आहे.
नोटाबंदीचे बळी
१०५
जणांचा मृत्यू. नोटाबंदीनंतर ९ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत
९०
जणांचा मृत्यू ८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर महिनाभरात झाला
पहिला बळी
उत्तर प्रदेशमधील फैजाबादमध्ये. नोटाबंदीचा निर्णय सहन न झाल्याने एका उद्योजकाचा मृत्यू
महत्त्वाची आकडेवारी
१५ लाख ५० हजार कोटी
रुपये, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला त्यावेळी चलनात होते
१४ लाख कोटी
रुपये, रिझव्र्ह बँकेकडे आतापर्यंत जमा झालेले पैसे
४ लाख ९० हजार कोटी
रुपये, रिझव्र्ह बँकेने २० डिसेंबपर्यंत नव्या नोटांच्या स्वरूपात चलनात आणले
दोन लाख एटीएम
निश्चलनीकरणानंतर रिकॅलिबरेट करण्यात आले
६३
रिझव्र्ह बँक व केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणा