मुंबई : कमकुवत पाया आणि सदोष संरचनेमुळे घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील महाकाय फलक पडल्याचा अहवाल व्हीजेटीआय संस्थेच्या दोन तज्ज्ञांनी दिला आहे. मुंबईला वादळी वाऱ्याचा धोका असतो. मात्र वादळी वाऱ्यात टिकेल इतक्या क्षमतेची या जाहिरात फलकाची संरचनात्मक बांधणी नव्हती, असा अहवाल या दोन तज्ज्ञांनी नुकताच पालिका प्रशासनाला दिला आहे.

घाटकोपरच्या छेडानगर येथे १३ मे रोजी महाकाय जाहिरात फलक पडून १४ जणांचा मृत्यू झाला. भविष्यात असा प्रसंग घडू नये यासाठी या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने व्हीजेटीआय या संस्थेची मदत घेतली होती. त्याकरिता पालिका प्रशासनाने संस्थेच्या संरचनात्मक अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग) विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहिले होते. या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्याच्या दृष्टीने हा अभ्यास करण्याची विनंती पत्रात करण्यात आली होती. संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख केशव सांगळे आणि डॉ. अभय बांबोले यांनी या दुर्घटनेतील तांत्रिक कारणांचा अभ्यास करून नुकताच आपला अहवाल सादर केला आहे.

Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Court comments on demolishing rehabilitation building in Maharashtra Sadan objecting to municipality actions
महाराष्ट्र सदन प्रकरणातील पुनर्वसन इमारत पाडण्याच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे
NITI Aayog diagnoses deterioration in maharashtra state financial health
राज्याचे ‘वित्तीय आरोग्य’ खालावल्याचे निती आयोगाकडून निदान
47 year old man who sexully abused girl with knife arrested by Wadala tt police
चाकूचा धाक दाखवून मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
पुणे: मद्यालयात झालेल्या वादातून ग्राहकांना बेदम मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मद्यालयातील कामगारांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा…मुंबई : शिवडीतील हत्येप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

केवळ प्रति तास ४९ किमी एवढ्या वाऱ्याचा वेग सहन करेल एवढीच या जाहिरात फलकाची क्षमता होती. मात्र १३ मे रोजी प्रति तास ८७ किमी एवढ्या वेगाने वारे वाहत होते. या वाऱ्यामुळे हा फलक उभा राहू शकला नाही, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. मुंबई शहर सागरी किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे प्रति तास १५८ किमी एवढ्या वादळी वाऱ्यात उभे राहू शकेल अशाच पद्धतीने फलकांची संरचना असायला हवी, असेही या अहवालात म्हटले आहे. मात्र घाटकोपरचा जाहिरात फलक हा मजबूत नव्हता. दोषपूर्ण संरचनेमुळे हा फलक पडल्याचे या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा…सावंत यांना वरळीतून कमी मताधिक्य; मुंबादेवी, भायखळ्यातील मताधिक्यामुळे विजय सुकर

मालाडमध्ये फलक हटविताना एक जखमी

मालाड येथील लिबर्टी मार्गावरील जवाहरलाल नेहरू क्रीडांगणानजीकचा पालिकेने नोटीस बजावलेला अनधिकृत डिजिटल फलक बुधवारी रात्री आठच्या सुमारास हटविताना कोसळला. हा फलक महेंद्र कुर्ले (६२) यांच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात जयकिरण कन्स्ट्रक्शनचे विकासक आणि संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर, पालिकेने अनधिकृत फलकांविरोधातील कारवाईला वेग देत अनेक अनधिकृत फलक हटविले. अद्यापही अनधिकृत फलक हटविण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. दरम्यान, जयकिरण कंपनीने इमारत बांधकाम स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेतली नव्हती. त्यानंतर नोटीस पाठवली होती.

Story img Loader