मुंबई : चेंबूरमधील खारदेव नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका तरुणावर चार दिवसांपूर्वी पूर्ववैमनस्यातून धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान रविवारी या तरुणाचा मृत्यू झाला. गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

विलास धनावडे असे मृत तरुणाचे नाव असून परिसरातच राहणाऱ्या विशाल माने (३२) याच्याबरोबर वाद होता. १८ ऑगस्टला विलास परिसरात असताना विशालने त्याच्यावर हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या विलासवर शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रविवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोवंडी पोलिसांनी यापूर्वीच गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मात्र विलासच्या मृत्युची माहिती परिसरातील रहिवाशांना मिळताच त्यांनी रविवारी रात्री गोवंडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. आरोपीवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी स्थानिकांनी केली.

Story img Loader