वेधशाळा आणि महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्रकल्पाअंतर्गत पुढील महिन्याभरात शहरातील २८ ठिकाणांच्या हवामानाची माहिती दर १५ मिनिटांनी मुंबईकरांना उपलब्ध होईल.
पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी तासाभरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात; पण शहरातील नेमक्या कोणत्या ठिकाणी पावसाची माहिती मिळत नाही. त्यात वाहतूक कोंडी होऊन जनजीवन ठप्प होते. यावर मार्ग काढण्यासाठी न्यायालयानेही पावसाची नियमित माहिती मुंबईकरांना देण्याची सूचना केली होती. सफर प्रकल्पाअंतर्गत त्यातील दहा ठिकाणी हवेची प्रतवारी नोंदवणारी केंद्र लावण्यास सुरुवात केली. आता २८ पैकी २४ ठिकाणचे काम पूर्ण झाले असून आयआयटी- पवई, सोमय्या महाविद्यालय- विद्याविहार व मुलुंड येथे तीन केंद्र लावली जाणार आहेत. हवामान केंद्रासाठी जागा, वातानुकूलन यंत्र व वीजशुल्क यांचा खर्च पालिकेने केला आहे.
या सर्व केंद्रावर तापमान, पाऊस, वाऱ्याची दिशा व वेग तसेच हवेचा दाब अशा माहितीची नोंद सुरू आहे. महिनाभरात संकेतस्थळामार्फत मुंबईकरांपर्यंत पोहोचणार आहे, असे मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
प्रक्रिया सुरू
दहिसर, मुलूंडपासून कुलाब्यापर्यंत प्रत्येक उपनगरात किमान एक केंद्र उभारले गेले आहे, तसेच १३ ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे हवामानाची माहिती देण्यात येत आहे. बोरीवली, मालाड, अंधेरी, भांडुप, चेंबूर, वांद्रे, वरळी, माजगाव व कुलाबा या नऊ ठिकाणची हवेची प्रतवारी व तापमान, वाऱ्याचा वेग व दिशा आदी माहितीही सफर संकेतस्थळावर मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा