बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांच्या वकिलाने कुंद्रा यांना ज्या अश्लील चित्रपटांच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारामध्ये मोडत असल्याचा युक्तीवाद केलाय. कुंद्रा यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सोमवारी मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची म्हणजेच पॉर्नची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणामध्ये कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी या कारवाईचं समर्थन करताना केला होता. त्यावर राज कुंद्रा यांनी पोंडा यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. आपण निर्माण केलेल्या कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. हा कंटेट अश्लील प्रकारामध्ये मोडतो असा युक्तीवाद कुंद्रांच्या वकिलांनी केलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा