राज्य मराठी विकास संस्था आणि सी-डॅक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. शासकीय गटात अकोला जिल्हा परिषदेच्या akolazp.gov.in  संकेतस्थळाला तर अन्य संकेतस्थळांच्या गटात ‘भूगाव’ http://www.bhugaon.com  या संकेतस्थळाला पहिला क्रमांक मिळाला आहे.  दोन्ही गटांतील पहिल्या क्रमांकासाठीचे पारितोषिक अनुक्रमे १५ हजार रुपये आणि ३५ हजार रुपये असे आहे.
शासकीय संकेतस्थळाच्या गटात १० आणि अन्य संकेतस्थळाच्या गटात ७४ अशा एकूण ८४ संकेतस्थळांचा समावेश होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. मंगेश करंदीकर, श्रद्धा काळेले, योगेश दंडवते, राहुल म्हैसकर, अमोल सुरोशे, प्रकाश पिंपळे यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील अन्य विजेते असे
शासकीय गट- म्हाडा mhada.maharashtra.gov.in द्वितीय क्रमाक, १० हजार रुपये. राज्य निवडणूक आयोग mahasec.com, तृतीय क्रमांक, ५ हजार रुपये
अन्य गट- यशवंतराव चव्हाण ybchavan.in, द्वितीय क्रमांक, २० हजार रुपये. केशवसुत ‘keshavsut.com आणि आधुनिक किसान http://www.adhunikkisan.com
तृतीय क्रमांक विभागून पारितोषिकाची रक्कम प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये.