मुंबई : तापमानातील घटीमुळे मुंबईच्या हवेतील गारठा आठवडावर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची अनुभूती आणखी काही दिवस घेता येईल. मुंबईतील हवेची गुणवत्ताही आणखी दोन दिवस खालावलेलीच असेल.

मुंबईत रविवारीही थंडी जाणवत होती. किमान तापमानात घट झाल्याने हवेत दिवसभर गारवा होता. तसेच सकाळचे वातावरणही धुरक्याने वेढले होते. दरम्यान, सांताक्रूझ येथे १७ अंश सेल्सिअस तर कुलाब्यात १९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. येत्या शनिवापर्यंत किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअस दरम्यान असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हवा खराबच..

वाऱ्यांचा वेग मंदावल्याने रविवारी हवेची गुणवत्ता ‘वाईट’ या श्रेणीत होती. पुढील दोन दिवस हवेचा दर्जा आणखी खालावेल, असा अंदाज हवेतील प्रदुषणाची नोंद घेणाऱ्या ‘सफर’ या संस्थेने व्यक्त केला आहे.

Story img Loader