भाज्यांचे भाव सध्या कडाडलेले असताना दादरकरांना मात्र भाजीवाल्यांच्या वेगळ्याच मुजोरीला सामोरे जावे लागत आहे. इथल्या मंडईत ग्राहकांच्या डोळ्यादेखत खुलेआम वजनात काटा मारण्याचे प्रकार घडत आहे. भाजीवाले वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवीत खुलेआम मापात पाप करीत असल्याने दादर पश्चिमेला भाजीचा मोठा बाजार भरतो. या मध्यवर्ती ठिकाणी केवळ दादरकरच नव्हे, तर मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे ग्राहक येऊन खरेदी करीत असतात. पण रेल्वे स्थानकाला लागूनच कवी केशवसुत पुलाखाली असलेल्या या भाजी बाजारात सध्या मोठय़ा प्रमाणावर वजनात काटा मारण्याचा प्रकार घडत आहे.
मुळात दादर स्थानकाकडे येणारा रस्ता वाट्टेल तसा अडवून हे भाजीवाले बेकायदेशीररीत्या येथे पसरलेले आढळून येतात. त्यातून येथे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना भाजीवाल्यांच्या मुजोरीला आणि दमदाटीला सामोरे जावे लागते. वजनात काटा मारणे हा प्रकार तर सर्रास घडतो. भाजीवाले ठरलेल्या एक किलोच्या किमतीत भाजी विकतात. मात्र प्रत्यक्षात ग्राहकाला एक किलो सांगून सातशे ते सहाशे ग्रॅम भाजीच वजनात तोलून दिली जाते. म्हणजेच तीनशे-चारशे ग्रॅमची भाजी हे वजनात मारतात.
यासाठी भाजीवाले अनेक युक्त्या लढवतात. तराजूत अनेक फेरबदल करून हे ग्राहकांना लुटतात. अनेकदा लोहचुंबकाचा वापर तराजूच्या वजनात फेरफार करण्यासाठी केला जातो. तराजूत ज्या ठिकाणी वजनाचे माप ठेवले जाते, त्याच्या खालीच चक्रासारखा भाग बनवून त्यात लोहचुंबक ठेवले जाते. एखादा ग्राहक सजग आढळून आला आणि त्याने योग्य वजनानुसारच भाजी देण्याचा आग्रह धरला तर विक्रेता सावधगिरीने चक्र खाली फिरवून लोहचुंबक खालच्या बाजूला करतो. पण अशा ग्राहकांना भाजीही चढय़ा दराने विकली जाते, पण सर्वसाधारण ग्राहक या युक्तीला फसतात.
काटा मारण्याविषयी भाजीवाल्याला विचारले तर तो इतर भाजीवाल्यांच्या तुलनेत भाजीचे भाव कमी आहेत ना, असा प्रश्न आपल्याच तोंडावर फेकतो. येथील बहुतांश भाजीवाले हाच प्रकार करतात, अशी तक्रार ग्राहक करतात. काही भाजीवाले तर खुलेआम दोन्ही पद्घतींचे तराजू घेऊन भाजी विक्रीसाठी बसलेले दिसतात. या सर्व प्रकारामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे तर अवैध भाजीविक्रेते
राज्याच्या वैध मापनशास्त्र यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांना भाजी विक्रेत्यांकडून होणाऱ्या फसवणुकीविषयी विचारले असता त्यांनी अशा अवैधपणे बसलेल्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करणे शक्य होत नाही, असे सांगितले. कारण कारवाईनंतरही ते पुन्हा दुसऱ्या ठिकाणी हे विक्रीसाठी बसतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मी परळला वास्तव्यास असल्यामुळे कामावरून सुटल्यानंतर येथे भाजी खरेदी करण्यासाठी नियमित येते. येथील विक्रेते हमखास वजनात काटा मारतात हा माझा अनुभव आहे. एकदा मी मुद्दाम येथील एका विक्रेत्याकडून एक किलो भाजी विकत घेतली आणि घरी जाऊन यांत्रिक तराजूवर त्याचे वजन केल्यावर त्यात दोनशे ग्रॅमचा फरक आढळून आला. तेव्हापासून मी वसईहून आलेल्या महिलांकडूनच भाजी विकत घेते. त्यांच्या वाटय़ावर लावलेल्या भाज्यांमध्ये किमान फसवणूक तरी होत नाही.
– शमा पावले, शिक्षिका