पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. देशभरात एकीकडे करोनाचं मोठं संकट सुरू असताना राजकीय वर्तुळात आज या निकालांची चर्चा आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना या निवडणुकांबाबत त्यांचं भाकित वर्तवलं आहे. “हे सगळ्यांना माहिती आहे. तामिळनाडू आणि पाँडिचेरी सोडून कुठेही सत्तापरिवर्तन होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच सरकार बनवेल. केरळमध्येही सत्तापरिवर्तन होणार नाही. नंदीग्रामबाबत चर्चा काहीही होऊ देत, पण ममतादीदींचं धैर्य मानायलाच हवं. त्या दोन जागांवर लढल्या नाहीत. त्या एकाच जागेवर लढल्या. त्यांनी आव्हान स्वीकारलं. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना हरवणं सोपं नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचंच सरकार येणार”, असं राऊत म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा