पश्चिम रेल्वेची सात महिन्यांत २,३३१ जणांवर कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुशांत मोरे, मुंबई</strong>

गर्दीच्या वेळी लोकलच्या डब्यातील दरवाजात उभे राहून अन्य प्रवाशांची अडवणूक करणाऱ्यांवर पश्चिम रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पश्चिम रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांनी गेल्या सात महिन्यांत २,३३१ जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये तर ७६३ महिलांचा समावेश आहे.

गर्दीच्या वेळी लोकलच्या दरवाजात उभे राहून काही प्रवाशांचे गट आत शिरण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांची अडवणूक करतात. त्यामुळे काही वेळा नियोजित लोकल निघून जाते आणि कार्यालय गाठण्यास विलंब होतो. लोकलमध्ये चढण्यात आडकाठी आणणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. या प्रकारांविरोधात अनेक तक्रारी पश्चिम रेल्वेकडे येत होत्या. यात महिला प्रवाशांच्या तक्रारींचाही समावेश होता. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र कारवाईत सातत्य नसल्याने अखेर पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने होमगार्ड व सुरक्षा दलाची पथके तयार केली. यात महिलांविरोधातील कारवाईसाठी चार जलद प्रतिसाद पथके नियुक्त करण्यात आली. प्रत्येक पथकात चार ते सहा महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली.

एप्रिल २०१८ ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत केलेल्या कारवाईत एकूण २,३३१ जण जाळ्यात अडकले. यामध्ये १,५६८ पुरूष, तर ७६३ महिलांचा समावेश आहे. ही कारवाई करताना लोहमार्ग पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे. सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत दरवाजे अडवण्याच्या घटना अधिक असल्याने या कालावधीत मोठी कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले. बोरीवली ते विरार या पट्टय़ात सर्वाधिक कारवाई होते त्यानंतर दादर ते अंधेरी दरम्यानही काही प्रमाणात कारवाई होत आहे. दरवाजा अडवणाऱ्यांना जास्तीत जास्त ५०० रुपये दंड आकारला जातो. तसेच त्यांना समजही दिली जाते.