अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे सध्या गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. मुंबईहून बडोदा, सुरतच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सात गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून पाच गाडय़ा बडोदा आणि अहमदाबाद येथे थांबवून रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईला बुधवारी येणाऱ्या काही गाडय़ा उशिराने येण्याची शक्यता पश्चिम रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.
गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या बडोदा विभागातील पालेज आणि मियाँगाव या दोन स्थानकांदरम्यानच्या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे सुरत आणि बडोदा विभागातील काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या, तर काही गाडय़ा सुरत, अहमदाबाद किंवा बडोदा येथे थांबवून रद्द केल्या. त्याचप्रमाणे काही गाडय़ांच्या मार्गात बदल केला असून त्या गंतव्यस्थानी रवाना झाल्या आहेत.
मंगळवारी रद्द केलेल्या गाडय़ा
* १२९३१ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद डबल डेकर
* १९१४३ वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद
* १२०१०अहमदाबाद-मुंबई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस
* १२९२८ बडोदा-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
* १९१४४ अहमदाबाद-वांद्रे टर्मिनस
* १२२६८ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल
* ५९४४० अहमदाबाद-बोरिवली
मध्येच रद्द केलेल्या गाडय़ा
(कंसातील स्थानकांत गाडय़ा रद्द करण्यात आल्या़)
* १९२१५ मुंबई सेंट्रल-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस (सुरत)
* १९०१८ जामनगर-वांद्रे टर्मिनस (अहमदाबाद)
* १९७०८ जयपूर-वांद्रे टर्मिनस (बडोदा)
* १४७०७ बिकानेर-वांद्रे टर्मिनस (बडोदा)
* १९००६ ओखा-मुंबई सेंट्रल (बडोदा)