अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे सध्या गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. मुंबईहून बडोदा, सुरतच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सात गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून पाच गाडय़ा बडोदा आणि अहमदाबाद येथे थांबवून रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईला बुधवारी येणाऱ्या काही गाडय़ा उशिराने येण्याची शक्यता पश्चिम रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.
गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या बडोदा विभागातील पालेज आणि मियाँगाव या दोन स्थानकांदरम्यानच्या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे सुरत आणि बडोदा विभागातील काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या, तर काही गाडय़ा सुरत, अहमदाबाद किंवा बडोदा येथे थांबवून रद्द केल्या. त्याचप्रमाणे काही गाडय़ांच्या मार्गात बदल केला असून त्या गंतव्यस्थानी रवाना झाल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा