मध्य रेल्वेच्या कल्याण व ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान तर पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव व बोरिवली स्थानकांदरम्यान ७ एप्रिलला अभियांत्रिकी कामानिमित्त पाच तासांचा मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर या वेळी मेगा ब्लॉक होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
रविवारी, सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या काळात कल्याणहून ठाण्याकडे येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. ठाण्याच्या पुढे जलद गाडय़ा या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर त्यांच्या नियमित थांब्यांव्यतिरिक्त थांबतील. त्याचप्रमाणे कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील गाडय़ा सकाळी १० ते दुपारी २.४० पर्यंत त्यांच्या नियमित थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबतील.
पश्चिम रेल्वेवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या काळात सर्व वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून बोरिवलीच्या फलाट क्रमांक ७, ८, २, १ आणि ३ येथून वाहतूक चालविण्यात येणार आहे. मेल एक्स्प्रेस गाडय़ा ६, ६ ए आणि ३ या फलाटांवरून जातील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा