लोकल, रेल्वेगाड्यामधून विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने, तिकीटधारक प्रवाशांची डोकेदुखी वाढू लागली. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेकडून वारंवार तक्रार केल्यानंतर, विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी विविध मोहिमा राबवून एप्रिल २०२४ मध्ये २.९४ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडून २०.८४ कोटींची दंडवसुली करण्यात आली. एप्रिल २०२३ च्या तुलनेत दंडाच्या रकमेत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> सलमान खान गोळीबार प्रकरण : आरोपींना मदत करणाऱ्याला राजस्थानमधून अटक

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
central railway loksatta
प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…
Unauthorized construction CIDCO proposal for Navi Mumbai
अनधिकृत बांधकामांना दंडाची पळवाट!  नवी मुंबईसाठी ‘सिडको’चा प्रस्ताव; सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोधदंड आकारणी कशी असेल?
Neelkamal boat passenger license and registration certificate suspended due to Passengers traveling in excess of capacity
नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र अखेर निलंबित, मुंबई सागरी मंडळाची कडक कारवाई
Mumbai western railway block
मुंबई : पश्चिम रेल्वेवर शनिवारी, मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी मुंबई लोकल सेवा, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन्स आणि विशेष रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम सातत्याने राबवली जात आहे. तिकीट नसलेल्या प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल २०२४ मध्ये अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबविल्या. त्यातून १,६३,८१९ विनातिकीट प्रवाशांना पकडून २०.८४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला. यामधील मुंबई उपनगर विभागातून ५.५७ कोटी रुपयांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> रेल्वे मार्गालगत वृक्ष छाटणीस वेग, वृक्ष छाटणीचे ५० टक्के काम पूर्ण

एप्रिल २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह २.९४ लाख विनातिकीट, अनियमित प्रवाशांना पकडून २०.८४ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ९८ हजार प्रकरणे शोधून ५.५७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी भरारी पथकाद्वारे तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमांद्वारे एप्रिल २०२४ मध्ये ४ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना दंड आकारण्यात आला. तसेच, त्यांच्याकडून १३.७१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पश्चिम रेल्वेने ‘बॅटमन २.०’ तिकीट तपासणी मोहीम आयोजित केली होती. याद्वारे रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आले. याद्वारे ३-४ मेच्या आणि ४-५ मे च्या रात्री विनातिकीट प्रवाशांना पकडून ३.४० लाख रुपयांची दंडवसुली केली. योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले.

                            एप्रिल २०२३                             एप्रिल २०२४

विनातिकीट प्रवासी             २.४६ लाख                                     २.९४ लाख

दंडवसुली                            १६.७६ कोटी                                      २०.८४ कोटी

मुंबई उपनगरीय विभाग ८३,५२२ प्रकरणे ९८ हजार प्रकरणे

दंडवसुली                         ४.७१ कोटी             ५.५७ कोटी

एसी लोकलमधील विनातिकीट ६,३०० प्रकरणे ४ हजार प्रकरणे

दंडवसुली                         २१.३४ लाख             १३.७१ लाख

Story img Loader