मुंबई : वसई-विरार मॅरेथॉन निमित्ताने ८ डिसेंबर रोजी विशेष लोकल चालविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी पहाटे चर्चगेट ते विरारपर्यंत दोन अतिरिक्त विशेष धीम्या लोकल चालविण्यात येतील. ८ डिसेंबर रोजी रात्री २.३० वाजता चर्चगेटहून धीमी लोकल चालविण्यात येईल.
ही लोकल विरारला पहाटे ४.०५ मिनिटांनी पोहचेल. यानंतर रात्री ३ वाजता दुसरी विशेष लोकल चालविण्यात येईल. ही लोकल पहाटे ४.३५ वाजता विरारला पोहचेल. या दोन लोकलमुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना लाभ घेता येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.