लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत असून त्याचा प्रवाशांना फटका बसला आहे.
आणखी वाचा-मुंबई: म्हाडा भरतीत आणखी एक गैरप्रकार
बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत सोमवारी सकाळी ११.०२ च्या सुमारास बिघाड झाला आणि जलद मार्गावरील लोकल खोळंबल्या. परिणामी, प्रवासी धीम्या लोकलमधून प्रवास करू लागले आणि धीम्या मार्गावरील लोकलमध्ये गर्दी वाढली. सिग्नल यंत्रणेतील बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सिग्नल यंत्रणेतील बिघाडाच्या दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम हाती घेतले. सुमारे ३० मिनिटांनी म्हणजे सकाळी ११.३५ वाजता सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र वेळापत्रक या बिघाडामुळे लोकल विस्कळीत झाली आहे.