पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेला ओव्हरहेड वायरमधील तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. अंधेरी आणि जोगेश्वरी या दोन स्थानकांदरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरवर दुसरीच वायर पडल्याने झालेल्या गोंधळात पश्चिम रेल्वेच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी-अंधेरी या स्थानकांदरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर दुपारी सव्वाच्या सुमारास ओव्हरहेड वायरवर एक दुसरीच वायर पडली. त्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला आणि चर्चगेटच्या दिशेने जाणारी गाडी जागीच थांबली. त्यानंतर या गाडय़ा अप जलद मार्गावरून चर्चगेटच्या दिशेने रवाना करण्यात आल्या. दुपारी पावणेदोनच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

Story img Loader