पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या सहा लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढविली आहे. मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या नवी दिल्ली (१२९५१/५२) व हजरत निजामुद्दीन (१२९५३/५४) या गाडय़ांना वातानुकूलित थ्री टायर आणि वातानुकूलित टू टायरचा प्रत्येकी एक डबा जोडण्यात आले आहेत. मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या इंदौर (१२९६१/६२) आणि वडोदरा (१९६२७/२८) या गाडय़ांना वातानुकूलित थ्री टायरचा एक आणि दुसऱ्या वर्गाच्या शयनयानचे दोन, असे प्रत्येकी तीन डबे जोडण्यात आले आहेत. वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या दिल्ली सराई रोहिला (१९०२९/३०) या गाडीला वातानुकूलित थ्री टायर आणि दुसऱ्या वर्गाच्या शयनयान असे दोन डबे तर जम्मू तावी (१९०२७/२८) या गाडीला दुसऱ्या वर्गाचा शयनयानचा एक डबा जोडण्यात आला आहे.

Story img Loader