मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील वाणगाव – डहाणू रोड स्थानकांदरम्यान मोनोपोलच्या पायाभूत कामानिमित्त शनिवारी आणि रविवारी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या ब्लाॅकमुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १०.३० ते ११.३० आणि रविवारी सकाळी ९.५० ते १०.५० पर्यंत एक तासाचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. शनिवारी असलेल्या ब्लाॅक कालावधीत विरारहून सकाळी ९.३० वाजता सुटणारी विरार – डहाणू रोड लोकल वाणगावपर्यंत चालवण्यात येणार आहे. तर, सकाळी १०.२५ ची डहाणू रोड-चर्चगेट लोकल वाणगाववरून सुटेल. चर्चगेटहून सकाळी ८.४९ वाजता सुटणारी चर्चगेट-डहाणू रोड लोकल वाणगावपर्यंत चालवण्यात येईल. तर, सकाळी १०.३५ वाजताची डहाणू रोड-विरार लोकल वाणगाववरून चालवण्यात येईल. शनिवारी गाडी क्रमांक १२९९० अजमेर – दादर एक्स्प्रेस ३५ मिनिटे आणि गाडी क्रमांक १२९८० जयपूर – वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस २५ मिनिटे उशिराने धावेल.

रविवारी चर्चगेटहून सकाळी ७.४२ वाजता सुटणारी चर्चगेट – डहाणू रोड लोकल वाणगावपर्यंत चालवण्यात येईल. तर, सकाळी १०.३५ ची डहाणू रोड – विरार लोकल वाणगाववरून चालवण्यात येईल. विरारहून सकाळी ९.३० वाजता सुटणारी विरार – डहाणू रोड लोकल बोईसरपर्यंत चालवण्यात येईल. तर, सकाळी १०.२५ ची डहाणू रोड-चर्चगेट लोकल बोईसरवरून सुटेल. गाडी क्रमांक १२९३४ अहमदाबाद – मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस ३५ मिनिटे, गाडी क्रमांक ०९६५३ अजमेर – वांद्रे टर्मिनस विशेष १ तास उशिराने धावेल.