मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने मंगळवारी अंधेरी रेल्वे स्थानकावर पहिले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू केले. त्या माध्यमातून प्रवासी आणि पर्यटकांना वातानुकूलित दर्जेदार जेवणाचा अनुभव मिळू शकेल. तसेच यात २४/७ सेवा मिळणार असून प्रवासी, पर्यटकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, मिष्टान्न असतील. लवकरच बोरिवली, वांद्रे येथील ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू होणार असून लोअर परळ, वसई रोड, वलसाड, सुरत येथे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा >>> बुलेट ट्रेनचा रोलिंग स्टॉक डेपो ठाण्यात उभारणार

जुन्या आणि सेवेतून बाद झालेल्या रेल्वे डब्यांचा वापर रेस्टाॅरंटसाठी करण्यात येत आहे. अंधेरी स्थानकावर अत्याधुनिक रचना असलेले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ तयार करण्यात आले असून त्यात एकाचवेळी ४८ जण बसण्याची क्षमता आहे. तसेच वातानुकूलित ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’मधून उत्तम जेवणाची सुविधा मिळणार आहे. यासह प्रवाशांना तेथून बांधूनही (टेक अवे काऊंटर) मिळणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader