रेल्वे मार्गाला समांतर आणि उन्नत रस्ता बांधण्याचे नियोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेल्वेच्या हद्दीतील जमिनींचा विकास करण्याकरिता राज्य सरकारकडून पाच एफएसआय मिळाल्यास पश्चिम रेल्वेला समांतर रस्ता बांधण्याची रेल्वेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामुळे वाहनांचा महालक्ष्मी ते बोरिवली असा प्रवास सुकर होण्यास मदत होईल. पश्चिम रेल्वेला समांतर असा चर्चगेट ते विरार उन्नत रेल्वे मार्ग बनविला जाणार होता; परंतु मेट्रोमुळे उन्नत मार्ग प्रकल्प गुंडाळण्यात आला. आता रेल्वेकडून पुढाकार घेऊन उन्नत आणि समांतर असा रस्ता बनवण्याचे नियोजन केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेसाठीचे ५४ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याकरिता एमआरव्हीसीला (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) निधीची गरज आहे. हा निधी रेल्वे हद्दीतील जमिनींचा विकास करून उभारण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्याकरिता राज्य शासनाकडे पाच एफएसआयची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाल्यास पश्चिम रेल्वेला समांतर व उन्नत रस्ता बांधणे शक्य होईल आणि बोरिवलीपर्यंतचा वाहनांचा प्रवास सुकर होईल, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एमआरव्हीसीकडून ‘एमयूटीपी- ३ ए’ येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याची योजना आहे. त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाला एप्रिल २०१८ मध्ये सादर केला जाईल. यामध्ये सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, पनवेल ते विरार उपनगरीय रेल्वे मार्ग, २१० वातानुकूलित लोकलसह अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्याचबरोबर एमआरव्हीसीकडून १५ रेल्वे स्थानकांत सुधारणा करण्यात येणार आहे. याशिवाय ‘भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळा’कडून ठाणे, मुंबई सेन्ट्रल, वांद्रे, बोरिवली यांसह अन्य काही स्थानकांचा विकास केला जाईल. एकंदरीतच या सर्व प्रकल्पांसाठी निधीची गरज आहे. रेल्वेने आपल्या मोकळ्या जमिनींचा विकास करून हा निधी उभारण्याच्या दृष्टीने योजना आखली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाच एफएसआयची (वाढीव चटई क्षेत्र) मागणी करण्यात आली आहे. त्याला मंजुरी मिळाली तर स्थानकांचा विकास करण्याबरोबरच मिळालेल्या निधीतून पश्चिम रेल्वेला समांतर असा वाहनांकरिता रस्ता उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.

रेल्वेमंत्री-मुख्यमंत्री यांच्यात बैठक

येत्या काही दिवसांत मुंबईतील रेल्वे प्रकल्पांवर चर्चा करण्याकरिता रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. त्या वेळी मोकळ्या जमिनींच्या विकासाबाबत चर्चा केली जाईल. रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणीही बैठकीत सहभागी होणार आहेत.

बांधकामे हटवणार

* परळ, महालक्ष्मी येथे रेल्वेच्या मोकळ्या जमिनी आहेत. महालक्ष्मीपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करून तो बोरिवलीपर्यंत नेण्यात येईल. हा रस्ता काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी पश्चिम रेल्वेला समांतर असा असेल. या कामांत काही ठिकाणी रेल्वेची बांधकामेही येत आहेत. मात्र ती हटवण्यात येतील. या रस्त्यामुळे वाहनांचा महालक्ष्मीपासूनच नव्हे तर चर्चगेटपासून बोरिवलीपर्यंतचा प्रवासही वेगवान होईल,’ असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.