मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते थेट बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा कूर्मगतीने सुरू असलेला प्रकल्प आता दृष्टीक्षेपात आला असून पुढील तीन वर्षात तो पूर्ण करण्याचा दावा पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पातील भू-तांत्रिक तपासणी, ड्रोन सर्वेक्षण, बाधित बांधकामे सर्वेक्षण, वृक्षतोड सर्वेक्षण ही कामे वेगाने पूर्ण झाली आहेत, कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

सध्या हार्बर मार्गावरून हार्बर मार्गावर सीएसएमटी – पनवेल, सीएसएमटी – अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी – अंधेरीदरम्यान हार्बर सेवा सुरू होती. सीएसएमटी येथून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करून नंतर पश्चिम रेल्वेने पुढचा प्रवास करीत होते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हार्बर सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी

हेही वाचा…मालाडमध्ये शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

मुळात हार्बर रेल्वेवरील अंधेरी ते गोरेगाव प्रकल्पाची घोषणा २००९ साली करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकल्पाची कामे पूर्ण होण्यास डिसेंबर २०१७ उजाडला. एप्रिल २०१८ पासून गोरेगावपर्यंत लोकल धावू लागली. तर, आता हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्याची योजना असून यासाठी ८२५.५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा…मुंबईत सोन्याच्या तस्करी प्रकरणी चौघांना अटक, डीआरआयकडून १०.५० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोरेगाव ते बोरिवली ७.०८ किमी रेल्वेमार्ग विस्तारीकरण आणि १६ उप-रेल्वेमार्ग तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या अभियांत्रिकी कामासाठी सल्लागाराची नियुक्ती आणि निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पाचे संरेखन , नकाशे तयार झाले आहेत. तसेच खासगी भूसंपादनासाठी मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव सादर केला आहे. सरकारी भूसंपादनाचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे भूसंपादन पूर्ण झाल्यावर रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यास ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात होईल. त्यानंतर जून २०२७ पर्यंत विस्तारीकरणाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

Story img Loader