पश्चिम रेल्वेवर राम मंदिर – गोरेगाव स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा फटका लोकल सेवेला बसला. पश्चिम रेल्वेवर जलद मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.
पश्चिम रेल्वेवरील वाहतूक मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली. राम मंदिर आणि गोरेगाव स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला असला तरी यामुळे जलदमार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे.