विरारहून चर्चगेटला येणाऱ्या लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वसई – विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शनिवारी दुपारी विरारहून चर्चगेटला येणाऱ्या लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये विरार स्टेशनजवळ बिघाड झाला. याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. वसई- विरार या मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक ठप्प झाली. पेंटाग्राफमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून लवकरच वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसल्याचे समजते.