मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्थानकात एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशावर तत्काळ प्रथमोपचार करण्याची योजना पश्चिम रेल्वेने आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या २० स्थानकांमध्ये ‘ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर’ (एईडी) यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी पुढील काही मिनिटे महत्त्वाची ठरतात. त्याच वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू टाळणे शक्य होते. हृदयविकाराचे प्रमाण तरुण पिढीमध्ये वाढू लागले आहे. रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागले. काळाची गरज ओळखून पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने २० रेल्वे स्थानकांमध्ये ‘एईडी’ यंत्रणा उपलब्ध करण्याची योजना आखली आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Parli Sarpanch accident shiv sena ubt group
Beed Crime: ‘बीड जिल्हा केंद्रशासित प्रदेश करा’, सरपंचाच्या अपघातानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Mumbai hostel girls convince warden to join the dance she came to stop Viral video
शेवटी तिही माणसंच! जोरजोरात गाणी लावून मुलींचा सुरू होता धिंगाना, अचानक हॉस्टेलच्या वॉर्डन आल्या अन्…VIDEOचा शेवट पाहून व्हाल अवाक्
Thane , non-agricultural tax , notices, Thane citizens,
सरकारने रद्द केलेल्या अकृषिक कराच्या ठाणेकरांना नोटीसा, नोटीसांमुळे नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप
person beaten Bhiwandi, Thane, person was beaten,
ठाणे : लघुशंका करण्यास मनाई केली म्हणून मारहाण
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!
Attack on doctor at Miraj, Miraj hospital,
सांगली : मिरजेत डॉक्टरवर हल्ला, रुग्णालयाची मोडतोड; घटनेचा निषेध, कारवाईची मागणी

हेही वाचा…मुंबई : अपहृत मुलाचा अवघ्या काही तासांत शोध घेण्यात पोलिसांना यश

स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर यंत्र अचानक हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. ही यंत्रणा चर्चगेट, मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅन्ट रोड, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई, नालासोपारा, विरार, बोईसर आणि वापी या २० स्थानकांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Story img Loader