दिवसेंदिवस लोकलमधील वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेवर ५ एप्रिलपासून  विनावातानुकूलित १२ डबा लोकलच्या अतिरिक्त ११ फेऱ्या धावणार आहेत. यामध्ये लोकलच्या अप दिशेला पाच, तर डाऊन दिशेला सहा फेऱ्या होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : गोवंडीतील मनोरंजन मैदान मियावाकी वनाने बहरले ; साडेतीन हजार देशी वृक्षांची लागवड

लोकलमधील वाढती गर्दी विभागण्यासाठी पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर केले असून या गाड्या चालवण्यात येत आहेत. नुकताच १५ डब्यांच्या वाढीव ६ फेऱ्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या एकूण १५० फेऱ्या होत आहेत. तर १२ डब्यांच्या ११ लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर लोकलच्या एकूण एक हजार ३८३ फेऱ्या होत होत्या. आता लोकलच्या फेऱ्यांची संख्या एक हजार ३९४ इतकी होणार आहे. अप आणि डाऊन प्रत्येकी ३ जलद लोकल धावणार असून या जलद लोकल सेवा बोरिवली आणि वांद्रे येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबणार नाहीत. तसेच सध्याच्या काही लोकल सेवांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.

अप मार्गावरील वाढीव फेऱ्या

सकाळी ९.४० गोरेगाव – चर्चगेट (धीमी)

सकाळी १०.४२ विरार- दादर (जलद)

सकाळी ११.५० गोरेगाव- चर्चगेट (धीमी)

दुपारी १.५३ विरार-अंधेरी (जलद)

दुपारी २.४७ विरार-बोरिवली (जलद)

डाऊन मार्गावरील वाढीव फेऱ्या

सकाळी ८.३८ चर्चगेट- गोरेगाव (धीमी)

सकाळी १०.५१ चर्चगेट- गोरेगाव (धीमी)

दुपारी १२.०६ दादर- विरार (जलद)

दुपारी २.०० अंधेरी- विरार (जलद)

दुपारी ३.२३ बोरिवली-विरार (जलद)

रात्री ९.५५ चर्चगेट- वांद्रे (धीमी)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway to run additional 11 non ac local train service from april 5 mumbai print news zws