मुंबई : पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी – गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत लोकलच्या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तसेच जलद मार्गावरील लोकलला फलाट उपलब्ध नसल्यामुळे लोकल राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधी मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल फक्त वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहेत. चर्चगेट – बोरिवलीच्या काही धीम्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार आहेत.