मुंबई : पश्चिम उपनगरातील वांद्रे, मालाड, बोरिवली परिसरात दोन वर्षांपासून ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून अनेक सोसायट्यांनी सुमारे १० हजारहून अधिक किलो खतनिर्मिती केली असून ‘मदरसन’ आणि ‘आयपीसीए’ या दोन संस्थांच्या माध्यमातून अविरतपणे हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था आणि शाळांचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आयपीसीए’ आणि ‘मदरसन’ या संस्थांच्या माध्यमातून २०२२ मध्ये मुंबईत ओल्या व सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणासह खतर्निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. मुंबईतील अनेक सोसायट्यांची पाहणी करण्यात आली आणि या प्रकल्पासाठी पश्चिम उपनगरातील ४० सोसायट्यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत संस्थेमार्फत कचरा वर्गीकरणासंदर्भात ४४ कार्यशाळा घेण्यात आल्या. घरकाम करणाऱ्या महिला आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये कचऱ्याच्या समस्येबाबत व त्यावरील उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी ४५ हून अधिक कार्यशाळा घेण्यात आल्या. पथनाट्यांद्वारे नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यात आली. या उपक्रमात सहभागी सोसायट्यांना १८२ हून अधिक कंपोस्टरचे वाटप करण्यात आले. कोणत्याही यंत्राचा वापर न करता पूर्णपणे पर्यावरपूरक पद्धतीने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

हेही वाचा…सागरी किनारा प्रकल्पातील बोगद्यांमधील गळती रोखण्याचे काम सुरूच

आतापर्यंत मुंबईसह दिल्ली, पुणे, बंगळूरू या शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या प्रकल्पात सहभागी सोसायट्या आणि शाळांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात निवडक शाळा आणि सोसायट्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख ८४ हजार ४९५ किलो कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली असून १० हजार ५६६ किलोहून अधिक खतनिर्मिती आणि ७ हजार ७५३ लिटर लिक्वीड फर्टीलायझर तयार करण्यात आले आहे. ओल्या कचऱ्यापासून निर्माण झालेल्या खताचा कशाप्रकारे वापर करावा याची माहिती रहिवाशांना देण्यात आली असून अनेकांनी खतांची विक्री केली आहे. तसेच, खतांचा वापर करण्यासाठी अनेकांनी फळभाज्यांचा बगीचा फुलविला आहे. तसेच, संस्थांच्या सहाय्याविनाही कचरा वर्गीकरणाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निश्चय सोसायट्यांनी केला.

प्लास्टिकच्या पिशव्यांचा दिवसेंदिवस वापर वाढत असून तो कमी करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अनेकदा प्लास्टिकच्या पिशव्या अडकून नाले तुंबतात. परिणामी, मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विशेष अधिकारी सुभाष दळवी यांनी केले.

हेही वाचा…आधी गर्दी स्थानकात, नंतर रस्त्यावर!; ब्लॉकमुळे अनेक आस्थापनांकडून कार्यालयांच्या वेळेत बदल; प्रवाशांच्या अडचणीत भर

विशेष पुरस्कारप्राप्त शाळा आणि सोसायटी

१) विशाल सह्याद्री सोसायटी

२) निर्मला मेमोरियल फाऊंडेशन कॉलेज ऑफ कॉमर्स अँण्ड सायन्स

३) अरुणास्मृती सोसायटी

४) सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट स्कूल

५) ऋषी हाईट