दै. लोकसत्ताच्या ‘दहावीनंतर काय?’ या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता वाशीत आयोजित करण्यात आलेल्या एका भरगच्च परिसंवादाने होणार आहे. वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात होणाऱ्या या कार्यक्रमात दहावीनंतरच्या उच्च शिक्षणविषयक विविध पर्यायांवर मार्गदर्शन करण्यात येईल. या परिसंवादाला ‘ग्रोथ सेंटर’च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती साळुंखे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, ‘स्टील फ्रेम सिव्हिल इंडिया’चे संचालक फारुख नाईकवाडे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका ५ ते ७ एप्रिल रोजी स. १०.३० ते दुपारी १२.३० आणि सायं. चार ते सात या वेळेत वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी समीर म्हात्रे (लोकसत्ता प्रतिनिधी) ०९०२१७८३४०८, इक्बाल कवारे (प्रमुख समन्वयक) – ०९८१९४४५०५५ यांच्याशी संपर्क साधावा.
‘दहावीनंतर काय?’ विषयावर परिसंवाद
दै. लोकसत्ताच्या ‘दहावीनंतर काय?’ या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता वाशीत आयोजित करण्यात आलेल्या एका भरगच्च परिसंवादाने होणार आहे. वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात होणाऱ्या या कार्यक्रमात दहावीनंतरच्या उच्च शिक्षणविषयक विविध पर्यायांवर मार्गदर्शन करण्यात येईल.

First published on: 06-04-2013 at 04:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What after ssc an informative seminar organise on 10 april