मुंबईः गणेश विसर्जन मिरवणूकीच्या काळात कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वाहतुकीसाठी २४ तास खुला ठेवण्यात येणार आहे.याशिवाय या परिसरात वाहतुकीसाठी हे पर्याय उपलब्ध असतील.
(दक्षिण विभाग)
१) उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत येणा-या तसेच दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईत जाणाऱ्या वाहन चालकांनी गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त कोस्टल रोडचा (धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वापर करावा.
२) विलासराव देशमूख पूर्व मुक्त मार्ग (फ्री वे) / अटलसेतुकडून दक्षिण मुंबई मार्गे उत्तर मुंबईत जाण्यासाठी फ्रीवे मार्गे पी. डिमेलो मार्ग – कल्पना जंक्शन येथून उजवीकडे वळून- भाटीया बाग जंक्शन येथे उजवीकडे वळून- सी.एस.एम.टी. जंक्शन येथे डावीकडे वळून महापालिका मार्गे मेट्रो जंक्शन येथे उजवीकडे वळून श्यामलदास जंक्शन येथे डावीकडे वळून प्रिंसेस स्ट्रीट-कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) उत्तर वाहिनीचा वापर करावा.
हेही वाचा >>>Ganesh Immersion 2024 Arrangements : दादर, वरळी भागांत कोणते रस्ते बंद, कोणते सुरू
३) उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबई मार्गे फि वे / अटल सेतुकडे जाण्यासाठी वाहन चालकांनी कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) दक्षिण वाहिनी – प्रिंसेस स्ट्रीट – श्यामलदास जंक्शन – श्यामलदास मार्ग – मेट्रो जंक्शन महापालिका मार्ग – सी. एस.एम.टी. जंक्शन – भाटीया बाग जंक्शन – कल्पना जंक्शन – पी. डिमेलो मार्गे – फि वे (विलासराव देशमूख पुर्व मुक्त मार्ग)/ अटल सेतु या दक्षिण वाहिनीचा वापर करावा.
कुलाबा वाहतुक विभाग, मुंबई.
अ) वाहतुकीस बंद रस्तेः-
9. नाथालाल पारेख मार्ग:-भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) ते सय्यद मोहम्मद जमादार चौक (इंदु क्लिनिक जंक्शन) पर्यतचा मार्ग वाहतुकीकरीता दोन्ही वाहिन्यांवर बंद राहील.
पर्यायी मार्ग:-भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) ते सय्यद मोहम्मद जमादार चौक (इंदु क्लिनिक जंक्शन) कडे न जाता सदरची वाहतुक कॅ. प्रकाश पेठे मार्गाने झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन) पासून पुढे इच्छित स्थळी जातील.
नाथालाल पारेख मार्गावरून येणारी व भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) कडे जाणारी वाहतुक ही पांडे लेन नाका, झुलेलाल मंदिर चौक आणि कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग ते भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) पासून पुढे इच्छित स्थळी जातील. नाथालाल पारेख मार्गावरील पांडे लेन नाका ते भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) दरम्यानचा मार्ग हा स्थानिक रहिवाशी आणि आपत्कालीन वाहनांकरीता वाहतुकीस खुला असेल.
२. कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग:-संत गाडगे महाराज चौक (धनपाल नाका) ते झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन) पर्यंत उत्तर वाहिनी वाहतुकीकरीता बंद राहील.
पर्यायी मार्ग:-संत गाडगे महाराज चौक (धनपाल नाका) ते झुलेलाल मंदिर चौक (पांडे लेन जंक्शन) कडे न जाता सदरची वाहतुक साधु टि.एल. वासवानी मार्गाने वर्ल्ड ट्रेड सेंटर, उजवे वळण मेकर टॉवर उजवे वळण
जी. डी. सोमानी मार्गाने झुलेलाल मंदिर चौकापासून (पांडे लेन जंक्शन) पुढे इच्छित स्थळी जातील.
३. रामभाऊ साळगांवकर मार्ग:-व्होल्गा चौक ते कमल मोरारका चौक दरम्यानचा मार्ग हा वाहतुकीस (आपत्कालीन वाहने वगळून) बंद राहील.
पर्यायी मार्ग:-रामभाऊ साळगांवकर मार्गाची वाहतुक ही शहिद भगतसिंग मार्ग (एस.बी. एस. मार्ग), नाथालाल पारेख मार्ग आणि कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाचा वापर करतील.
४. पांडे मार्ग :-पांडे मार्ग हा एक दिशा मार्गाच्या ऐवजी दुहेरी वाहतुकीस उपलब्ध राहील.
५. नाथालाल पारेख मार्ग:- पांडे लेन नाका ते कुलाबा पोष्ट ऑफीस हा एक दिशा मार्गाच्या ऐवजी दुहेरी वाहतुकीस उपलब्ध राहील.
हेही वाचा >>>सर्वकार्येषु सर्वदा: विज्ञान प्रसाराला हवी आर्थिक पाठबळाची जोड
… येथे वाहने उभी करण्यास बंदी
१) नाथालाल पारेख मार्ग: कुलाबा पोस्ट ऑफीस ते सय्यद मोहम्मद जमादार चौक (इंदु क्लिनिक जंक्शन) पर्यत
२) कॅ. प्रकाश पेठे मार्ग:- संत गाडगे महाराज चौक (धनपाल नाका) ते दिपक जोग चौक (ललित जंक्शन) पर्यत.
३) पांडे मार्ग
४) रामभाऊ साळगांवकर मार्ग
मरीन ड्राईव्ह वाहतुक विभाग, मुंबई
अ) वाहतुकीस बंद रस्तेः-
नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग-उत्तर वाहीनी वरील वाहतुक ही आवश्यकतेनुसार इस्लाम जिमखान्यापासुन कोस्टल रोड मार्गे वळविण्यात येईल.
वाहने उभी करण्यास बंदी…
नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग- एअर इंडीया जंक्शन ते मफतलाल जंक्शन (दक्षिण व उत्तर वाहीनी)
आझाद मैदान वाहतुक विभाग, मुंबई
वाहतुकीस बंद रस्तेः-
महानगरपालीका मार्ग:- सी. एस. एम. टी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत वाहतुक (आवश्यकतेनुसार) प्रतिबंधित असेल.
पर्यायी मार्ग:- सी. एस. एम. टी जंक्शन वरून डि. एन रोड व एल. टी. मार्गे ते मेट्रो जंक्शन (वासुदेव बळवंत फडके चौक) अशी वळविण्यांत येईल.
* काळबादेवी वाहतुक विभाग
वाहतुकीस बंद रस्तेः-
१) जे. एस. एस. रोड-संगीतकार अब्दुल करीम खान चौक (अलफ्रेड जंक्शन) ते समतानंद अनंत हरी गद्रे चौक (पोर्तुगीज चर्च) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग- महर्षी कर्वे मार्ग व एन एस रोड मार्गे वळविण्यात येईल.
२) विठठ्ठलभाई पटेल मार्ग कस्तुरबा गांधी चौक (सी पी टैंक सर्कल) ते भगवान श्री चंद्रप्रभा चौक (हॉटेलनित्यानंद जंक्शन) हा रस्ता वाहतुकीस बंद राहील. पर्यायी मार्ग-वाहतुक काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.
३) बाबासाहेब जयकर मार्ग-डॉ. चंद्रकला हाटेबाई चौक (घोडागाडी जंक्शन) ते डॉ. यशवंत सामंत चौक (खत्तर गल्ली नाका) बंद राहील. पर्यायी मार्ग- वाहतुक काळबादेवी रोड व महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.
४) राजा राम मोहन रॉय रोड-चारुशीला गुप्ते चौक (चर्नी रोड स्टेशन जंक्शन) ते पद्मश्री गोवर्धन बाप्पा चौक (प्रार्थना समाज जंक्शन) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील. पर्यायी मार्ग-वाहतुक महर्षी कर्वे मार्गने वळविण्यात येईल.
५) कावसजी पटेल टैंक रोड-तीन बत्ती नाका (गुलालवाडी सर्कल) ते कस्तुरबा गांधी चौक (सी पी टॅंक सर्कल) वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग- वाहतुक बापु खोटे स्ट्रिट व मौलाना आझाद रोड मार्गाने वळविण्यात येईल.
६) संत सेना मार्ग (दुसरा कुंभारवाडा रोड) एम एस अली रोड येथील जंक्शन ते संत श्री पुनित महाराज चौक (नानुभाई देसाई रोड येथील जंक्शन) वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग-वाहतुक मोहमद अली रोडने वळविण्यात येईल.
७) नानुभाई देसाई रोड-गोकुळधाम जंक्शन ते लक्ष्मीनारायण मंदीर चौक (माधवबाग) वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग-वाहतुक मौलाना आझाद रोड व बापु खोटे स्ट्रिटने वळविण्यात येईल.
८) सरदार वल्लभभाई पटेल रोड-गोल देवूळ ते पदमश्री गोवर्धन बाप्पा चौक (प्रार्थना समाज जंक्शन) वाहतुकीस बंद राहील.
पर्यायी मार्ग-वाहतुक मौलाना आझाद रोडने वळविण्यात येईल.
वाहने उभी करण्यास बंदी (नो-पार्कीग)
१) ने एस एस रोड-अल्फ्रेड जंक्शन पासुन पोर्तुगीज चर्चपर्यंत
२) व्ही पी रोड हा सी पी टैंक सर्कल ते नित्यानंद होटेल जंक्शन
३) बाबासाहेब जयकर मार्ग हा घोडागाडी जंक्शन ते खत्तर गल्ली नाका
४) राजाराम मोहन रॉय रोड हा चर्नी रोड स्टेशन ते प्रार्थना समाज
५) सी पी टैंक रोड हा गुलालवाडी जंक्शन ते सी पी टॅक सर्कल
६) संत सेना मार्ग हा संत सेना मार्ग जंक्शनसह मौलाना शौकत अली रोड व जंक्शन ते नानुभाई देसाई रोड
७) नानुभाई देसाई मार्ग हा गोकुळ धाम जंक्शन ते लक्ष्मी नारायण जंक्शन चौक
८) एस व्ही पी रोड हा गोल देउळ ते प्रार्थना समाज जंक्शन पर्यंत
पायधुनी वाहतूक विभाग
वाहतुकीस बंद रस्तेः-
१) जिनाभाई मुलजी राठोड मार्ग-आवश्यकतेनुसार, शिवदास चापसी जंक्शन ते काकळीज चौक हा रस्ता वाहतूकीस बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : वाहतूक बॅरीस्टर नाथ पे मार्ग, रे रोड जंक्शन, संत सावता मार्ग, डॉ.बी.ए. रोड मार्गे
२) पी डिमेलो रोड-आवश्यकतेनुसार, काकळीज चौक ते वाडीबंदर जंक्शन हा रस्ता वाहतूकीस बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : वाहतूक एस.व्हि.पी रोड, मौलाना मोहम्मद अली जोहर चौक (भेंडीबाजार जंक्शन), इब्राहिम रहिमतुल्ला रोड, सर जे.जे रोड, डॉ. बी.ए. रोड
२) वाहतुक अल्बर्ट जंक्शन ते बी.पी.टि मार्गे वळविण्यात येईल.
वाहने उभी करण्यास मनाई
१) रामचंद्र भट्ट मार्ग डॉ. अलीमा मोहम्मद इक्बाल चौक (जे. जे. जंक्शन) ते लक्ष्मण नारायण जाधव मार्ग जंक्शन
२) शिवदास चापसी मार्ग नुरबाग जंक्शन ते महाराणा प्रताप चौक (हँकॉक ब्रिज मार्गे)
३) सामंतभाई नानजी मार्ग (जेल रोड) नुरबाग जंक्शन ते चार नळ जंक्शन.
४) डॉ. मैशेरी रोड- नुरबाग जंक्शन ते एस.टि जंक्शन.
५) मौलाना आझाद रोड- दोन टाकी जंक्शन ते गोल देऊळ जंक्शन.
६) मौलाना शौकत अली रोड जे.जे. जंक्शन ते दोन टाकी जंक्शन.
डी.बी. मार्ग वाहतूक विभाग, मुंबई
वाहतूकीस बंद रस्ते :-
१) एन.एस. रोड-बॅण्ड स्टॅन्ड ते मफतलाल दक्षिण वाहिनी
पर्यायी मार्गः कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग)
२) दादासाहेब भडकमकर मार्ग-नवजीवन सर्कल ते कै. गजानन वर्तक चौक (एम पॉवेल चौक) बंद राहील
पर्यायी मार्गः पठ्ठे बापुराव मार्ग, ताडदेव सर्कल, जावजी दादाजी मार्ग, नाना चौक, जे.एस. एसमार्ग, ऑपेरा हाऊस जंक्शन, महर्षी कर्वे रोड मार्गे वळविण्यात येईल.
३) सरदार वल्लभभाई पटेल मार्ग पद्मश्री गोवर्धन बाफना चौक (प्रार्थना समाज चौक) ते विनोली जंक्शन बंद राहील.
पर्यायी मार्गः वाहतूक राजाराम मोहन रॉय रोड, निवृत्ती बाबुराव चौक (बाटा जंक्शन) बाळाराम पथ, रूसीमेहता जंक्शन, नवजीवन जंक्शन, ताडदेव सर्कल, नाना चौक, विल्सन जंक्शन मार्गे वळविण्यात येतील.
ब) एक दिशा मार्ग :-
वाळकेश्वर रोड:-सदरचा रस्ता दुहेरी दिशा वाहतूकीऐवजी एकेरी दिशा मार्गी असेल तसेच आर.डी. सावंतवौकापासुन (तीनबत्ती जंक्शन) ते भा. रा. तांबे चौक (बॅडस्टॅन्ड) पर्यत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रस्ता वाहतुकीस बंद राहील. तथापी बेस्ट बसेस नमुद केलेल्या रस्त्यावरून धावतील.
पर्यायी मार्ग:-वाहतुक बी. जे. खेर रोड, केम्स कॉर्नर, स्वामी श्री. प्रेमपुराजी चौक (आर.टी.आय. जंक्शन), बॅडन्स्टॅन्डव नेपियन्सी रोड या मार्गाने वळविण्यात येईल
वाहने उभी करण्यास मनाई …
१) जे.एस.एस. मार्ग – केनेडी ब्रीज ते पंडित पलुस्कर चौकापासुन (ऑपेरा हाऊस जंक्शन) ते अनंत हरी चौक (पोतुर्गीज चर्चजंक्शन)
३) एस.व्ही.पी. रोड :- प्रार्थना समाज ते विनोली जंक्शन
२) डी. बी. मार्ग :- मराठे बंधु चौक ते नवजीवन जंक्शन.
४) एन. एस. रोड-मोरखी लेन ते मफतलाल जंक्शन
५) बाळाराम पथ :- रूसी मेहता मार्ग ते बाटा जंक्शन
६) आर. आर. रोड :- बाटा जंक्शन ते प्रार्थना समाज जंक्शन (गोवर्धन बाफना चौक)
ताडदेव वाहतूक विभाग
वाहतूकीस बंद रस्ते :-
१. पंडिता रमाबाई मार्ग: डॉ.एन.एस. पुरंदरे मार्ग जंक्शन (आचार्य आनंद सागर सुरिश्वरजी महाराज चौक/विल्सन जंक्शन) पासून सिताराम पाटकर मार्गापर्यंत (सिशिल जंक्शन)
पर्यायी मार्ग :- विल्सन जंक्शन ते सिशिल जंक्शन वरील वाहतूक बॅडस्टैंड, स्वामी श्री प्रेम पुरीजी चौक (आरटीआय जंक्शन), एन. एस. पाटकर मार्गे वळविण्यात येईल.
२. पंडिता रमाबाई मार्ग ना. जगन्नाथ शंकरशेट चौक (नाना चौक ते सिताराम पाटकर मार्गापर्यत (सिसील जंक्शन) एक दिशा मार्ग असेल. नानाचौक कडून सिसील जंक्शनपर्यंत वाहनांना मनाई
पर्यायी मार्ग:- वाहने ऑगस्ट क्रांती मार्ग, केम्प्स कॉर्नर, सिताराम पाटकर मार्गे वळविण्यात येतील.
३) ना. जगन्नाथ शंकरशेट मार्ग हा मार्ग दोन दिशा ऐवजी एक दिशा मार्ग असेल, नाना चौकाकडून केनेडी ब्रिज मार्गे पंडित पलुस्कर चौक पर्यंत कोणतीही वाहने जाणार नाहीत. पर्यायी मार्ग :- नाना चौक कडून ऑपेरा हाऊस कडे जाणारी वाहतूक ऑगस्ट क्रांती मार्गाने केम्प्स कॉर्नर, आरटीआय जंक्शन मार्गे वळविण्यात येईल.
४) एम.एस. अली मार्ग : हा एक दिशा मार्ग असेल, नाना चौक कडून फरेरे ब्रिज मार्गे विनाबेन एच. त्रिवेदी चौकाकडे कोणतीही वाहने जाणार नाहीत.
पर्यायी मार्ग :- ऑगस्ट क्रांती मार्ग, केम्प्स कॉर्नर, सिताराम पाटकर मार्गे वळविण्यात येतील.
५) पठ्ठे बापूराव मार्ग :- हा मार्ग एक दिशा मार्ग असेल. वसंतराव नाईक चौकाकडून डायना ब्रिज मार्गे नवजीवन सोसायटीकडे कोणतीही वाहने जाणार नाहीत.
पर्यायी मार्ग :- वाहने पंडित मदनमोहन मालविया मार्ग, हाजीअली जंक्शन, केशवराव खाडे मार्गे वळविण्यात येतील.
६) जावजी दादाजी मार्ग (ताडदेव रोड): हा मार्ग एक दिशा मार्ग असेल, वसंतराव नाईक चौकाकडून नाना चौकाकडे कोणतीही वाहने जाणार नाहीत.
पर्यायी मार्ग :- वाहने पंडित मदनमोहन मालवीया मार्ग, हाजी अली जंक्शन, डॉ. जी. देशमुख मार्ग, केम्प्स कॉर्नर, ऑगस्ट क्रांती मार्गे वळविण्यात येतील.
७) ए.आर. रांगणेकर मार्ग (फेच ब्रिज) एक दिशा मार्ग, ए.आर. रांगणेकर मार्गावरुन फेच ब्रिजवरुन पंडित पलुस्कर चौकाकडे (ऑपेरा हाऊस जंक्शन) जाणारा मार्ग वाहतूकीस बंद असेल.
पर्यायी मार्ग:-ए.आर. रांगणेकर, सिताराम पाटकर, सिसील जंक्शन, आर.टी.आय. जंक्शन, बाबुलनाथ रोड
वाहने उभी करण्यास मनाई
१) जगन्नाथ शंकरशेठ मार्ग: नाना चौक ते पंडित पलुस्कर चौक
२) पंडित रमाबाई मार्ग: नाना चौक ते आचार्य श्री आनंद सागर सुरीश्वरजी महाराज चौक/विल्सन जंक्शन
३) न्या. सिताराम पाटकर मार्ग:- संगीतकार देवधर वौक (सुखसागर जंक्शन) ते केम्प्स कॉर्नर ब्रिज
४)ऑगस्ट क्रांती मार्ग: नाना चौक ते केम्प्स कॉर्नर जंक्शन
५) जावजी दादाजी मार्ग: ताडदेव सर्कल ते नाना चौक
६) पंडित मदनमोहन मालविया मार्ग (ताडदेव रोड) ताडदेव सर्कल ते वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली जंक्शन)
७) बाबुलनाथ मंदिर मार्ग :- आर.टी.आय. जंक्शन ते बॅन्ड स्टॅन्ड
* नागपाडा वाहतुक विभाग, मुंबई
वाहतूकीस बंद रस्ते :-
१) एन.एम. जोशी मार्ग ‘एकदिशा’ मार्ग असेल, आणि गुलाबराव गणाचार्य चौक (चिंचपोकळी जंक्शन) ते खटाव मिलपर्यंत कोणतीही वाहने जाऊ शकणार नाहीत.
पर्यायी मार्ग -वाहतुक साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) सात रस्ता
२) बी.जे. मार्ग (बापूराव जगताप मार्ग) – संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता जंक्शन) ते ए.एच. अब्दुल हमीद अन्सारी चौक (खडा पारशी जंक्शन) या रस्त्यावर कोणतीही वाहने येणार नाहीत.
पर्यायी मार्ग – वाहतुक सातरस्ता जंक्शन, सारे गुरुजी मार्ग, नायर रोड, बोमन बेहरामजी मार्ग, सर जेजे मार्गे वळविण्यात येईल
३) मिर्झा गालीब मार्ग (क्लेअर रोड) ‘एकदिशा’ मार्ग असेल आणि मौलाना फजुल हसन हसरत मोहनी चौक (नागपाडा जंक्शन) ते खडा पारशी जंक्शनपर्यंत बंद
पर्यायी मार्ग – नागपाडा जंक्शन, सोफिया झुबेर रोड, सोफिया झुबेर जंक्शन, इस्माईल पी. मर्चेंट चौक, डॉ. बी.ए. रोड
४) मौलाना आझाद रोड-नागपाडा जंक्शन ते दोन टाकी जंक्शन बंद
पर्यायी मार्ग-वाहतुक सोफिया जुबेर रोड, सर जेजे मार्गे वळविण्यात येईल.
५) बोहमन बेहरामजी रोड (बेलासिस रोड) नागपाडा जंक्शन ते डॉ. के.ए. हमीद चौक (मुंबई सेंट्रल जंक्शन) बंद
पर्यायी मार्ग – वाहतुक मौलाना आझाद रोड, सातरस्ता जंक्शन, केके रोड मार्गे वळविण्यात येईल.
६) मौलाना शौकत अली रोड शुक्लाजी स्ट्रीट जंक्शन ते दोन टाकी जंक्शन पर्यत बंद
पर्यायी मार्ग-वाहतुक शुक्लाजी स्ट्रीट जंक्शन, आर. एस. निमकर मार्ग, लिंगान्ना पुजारी चौक (अलेक्झांडर जंक्शन), बोहमन बेहरामजी मार्ग, सोफिया झुबेर रोड, सर जेजे रोड मार्गे वळविण्यात येईल.
वाहने उभी करण्यास मनाई
१) एन.एम. जोशी मार्ग चिंचपोकळी जंक्शन ते खटाव मिल
२) साने गुरुजी मार्ग चिंचपोकळी जंक्शन ते सातरस्ता जंक्शन ते घास गल्ली
३) बापुराव जगताप मार्ग- सातरस्ता जंक्शन ते खडापारशी जंक्शन
४) मिर्झा गालिब मार्ग (क्लेअर रोड) खडापारशी जंक्शन ते नागपाडा जंक्शन
५) मौलाना आझाद रोड सातरास्ता जंक्शन ते दोन टॉकी जंक्शन
६) मौलाना शौकत अली रोड-दोन टाकी जंक्शन ते शुक्लाजी स्ट्रीट जंक्शन
७) नायर रोड- घास गल्ली ते मुंबई सेंन्ट्रल जंक्शन
८) डि.बी. मार्ग- मुंबई सेन्ट्रल जंक्शन ते नवजीवन वौक.
९) आर.एस. निमकर मार्ग बेहराम नाका ते रुसी मेहता जंक्शन
भायखळा वाहतुक विभाग, मुंबई
वाहतूकीस बंद रस्ते :-
१) डॉ.बी.ए. रोड, उत्तर वाहिनी, हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड जंक्शनपर्यंत) ते कॉमेड कृष्णा देसाई चौकपर्यत (भारतमाता जंक्शन) बंद
पर्यायी मार्ग:- डॉ.बी.ए. रोड, उत्तर वाहिनीवरील वाहने हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड जंक्शन) – घेवून टि.बी. कदम मार्ग जी. डी. आंबेकर मार्ग श्री साईबाबा रोड मार्गे- भारतमाता जंक्शनकडे जाता येईल. डॉ.बी.ए. रोड, उत्तर वाहिनीवरून दादरकडे जाणारी वाहने लालबाग पुलाचा वापर करू शकतील.
२) डॉ.बी.ए. रोड, दक्षिण वाहिणी-कॉम्रेड कृष्णा देसाई चौकपर्यत (भारतमाता जंक्शन) ते हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड जंक्शनपर्यंत) बंद राहिल. पर्यायी मार्ग:- दक्षिण वाहिनीवरून सीएसएमटीकडे कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) – करी रोडब्रिज-शिंगटे मास्तर चौक-एन.एम. जोशी मार्ग-कॉम्रेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन)- अब्दुल हमिद अन्सारी चौक (खडा पारसी) येथुन दक्षिण मुंबईकडे जाता येईल.
३) डॉ.बी.ए. रोड, दक्षिण वाहिनीवरून सीएसएमटीकडे जाणारी वाहने लालबाग ब्रिजचा वापर करतील. ३) साने गुरूजी मार्ग-कॉमेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन) ते संत जगनाडे महाराज चौकपर्यंत (गॅस कंपनी) बंद राहिल.
पर्यायी मार्ग:-सदर मार्गावरील वाहतूक एन.एम. जोशी रोड शिंगटे मास्तर चौक करी रोड ब्रिज मार्गे- कॉम्रेड कृष्णा देसाई चौककडे (भारतमाता जंक्शन) वळविण्यात येईल.