डोंबिवलीतील महिलांवरील अत्याचाराची मालिका सुरूच असून, मंगळवारी रात्री त्यात आणखी एका संतापजनक घटनेची भर पडली. एका तरुणाने त्याच्या मैत्रिणीचाच भररस्त्यात विनयभंग केला, एवढेच नव्हे, तर तिच्या दुसऱ्या मित्राला आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण केली. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, न्यायालयाने त्यांना बुधवारी जामीन मंजूर केला. छेडछाडीच्या या सततच्या घटनांमुळे पोलिसही हैराण झाले असून, सर्वसामान्य डोंबिवलीकर या असंस्कृत प्रकारांनी सुन्न झाले आहेत. दीपेश सोळंकी (वय १८), संदीप अहिर (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असून, त्यांत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हे तिघे पेंडसेनगरमध्ये नेहरू मैदानाजवळ राहतात. दीपेश नृत्य प्रशिक्षक आहे. त्याची मैत्रीण त्याच्याच संस्थेत नृत्याचे धडे घेते. ती मंगळवारी रात्री आपल्या प्रशांत नार्वेकर या मित्राबरोबर शहरातील चार रस्ता येथे फालुदा खात उभी असताना दीपेश व त्याचे दोन मित्र तेथे आले. त्या वेळी दीपेशने तिला धक्काबुक्की करीत तिचा विनयभंग केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा