काँग्रेस नेते राहुल गांधींनी भारत जोडो पदयात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधींच्या विधानानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय यावेळी त्यांनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

हेही वाचा – “…म्हणून राहुल गांधींचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे” ; आशिष शेलारांचं पत्रकारपरिषदेत विधान!

पत्रकारपरिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, “खरंतर हिंदुस्थानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती.शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तरी बोटचेपी भूमिका घेऊ नये, ही अपेक्षा होती. पण उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपी भूमिका घेतली. केवळ मी, माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी, यासाठी स्वत:च्या वडिलांचे जे विचार होते, त्यालाही तिलांजली देऊन उद्धव ठाकरे तुम्ही बोटचेपी भूमिका तुम्ही का घेतली? हा आमचा तुम्हाला सवाल आहे.”

हेही वाचा – “शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये; विचार व्यक्त करायला कृती असावी लागते”; उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा!

याशिवाय “मी राहुल गांधींना बेअक्कल म्हटल्यामुळे आता कोणाला म्हणणार नाही. उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा, जुन्या मैत्रीचा दाखला म्हणून आम्ही जी पुस्तके देऊ ती नक्की वाचावीत. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात सक्रीय होते की नाही याचं उत्तर त्यांना मिळेल. स्वत: डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्यपूर्तीच्या अभियानात सक्रीय होते. यापेक्षाही अधिकची माहिती हवी असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन काळातील वर्गांमध्ये महात्मा गांधींनी सुद्धा भेट दिली होती किंवा महात्मा गांधींच्या विदर्भाच्या भेटीत संघ स्वयंसेवकांनी सुद्धा सेवाकार्य केलं होतं. हेही त्यांना माहीत नसेल, त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुढचं माहिती असल्याचा प्रश्नच येत नाही.” असंही शेलारांनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा – “…ते पाहिलं की असं वाटतं त्यांनी या स्मृतिस्थळावर येऊच नये”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर निशाणा!

याचबरोबर “देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी दिल्लीतील आपल्या परेडमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना परेडसाठी बोलावलं होतं. या सगळ्या गोष्टींना उद्धव ठाकरे अनभिज्ञ आहेत. जे स्वत:च्या वडिलांचे विचार विसरले ते इतिहास विसरले तर नवल ते काय?”

Story img Loader