काँग्रेस पक्षाची सारी मदार आता मिझोरामवर आहे. उद्या मतमोजणी होणाऱ्या या राज्यात सत्ता कायम राखल्यास ५-० पराभव स्वीकारण्याची नामुष्की काँग्रेसवर येणार नाही. मिझोरामध्ये लागोपाठ तिनदा काँग्रेस सत्तेत असला तरी यंदा मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. देशात काँग्रेसच्या विरोधात असलेल्या वातावरणाचा ईशान्येकडील राज्यात फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपने ४-० असे पराभूत केल्याने काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. निदान मिझोरामची सत्ता कायम राहील या भरवशावर काँग्रेसचे नेते आहेत.

Story img Loader