लोकप्रिय मेसेंजर सुविधा व्हॉट्सअॅपने एक नवी सुविधा सुरू केली असून आपण ज्या व्यक्तीला संदेश पाठविला आहे तो संदेश तीने वाचला आहे की नाही याबाबची माहिती आता मिळणार आहे. आपण संदेश पाठविल्यावर दोन बरोबरच्या खुणा आल्यावर संदेश मिळाला असे आपण समजत होतो. पण आता या खुणा निळय़ा रंगाच्या झाल्या म्हणजे संदेश वाचला असा अर्थ होणार आहे.
व्हॉट्सअॅपला पर्यायी असलेल्या हाईक या मेसेंजिग अॅपमध्ये आपल्याला संदेश पाठविला, संदेश पाहोचला आणि संदेश वाचला अशा तिन्ही गोष्टी समजतात. व्हॉट्सअॅपवर यातील पहिल्या दोन सुविधा उपलब्ध होत्या. पण संदेश वाचला की नाही हे आपण त्या व्यक्तीचे लास्ट सीन पाहून अंदाजे ठरवत होतो. पण काही जणांनी सुरक्षा पर्याय म्हणून लास्ट सीन डिस्प्ले होणेही बंद केले होते. यामुळे आपण पाठविलेला संदेश समोरच्या व्यक्तीने वाचला की नाही हे आपण नेमके समजू शकत नव्हतो. यामुळेच आता जर आपण संदेश पाठविलेल्या व्यक्तीने संदेश वाचल्यावर निळय़ा रंगाच्या बरोबरच्या खुणा दाखविणे सुरू केले आहे.

Story img Loader