व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने ग्रुपमधील मेंबर्सनी अॅडमिनवर चाकूहल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात ग्रुप अॅडमिन बंटी कुर्सिजा जखमी झाला आहे.
उल्हासनगरमध्ये येथे बंटी गूल कुसिज्या नावाच्या कपड्याच्या व्यापाऱ्याने व्हॉटसअपवर ‘जय हो’ नावाचा ग्रुप बनवला होता. त्यामध्ये अनिल मुखी आणि नरेश रोहरा यांचादेखील समावेश होता. मात्र, ते अश्लील मेसेज, फोटो पाठवत असल्याने बंटीने त्या दोघांना ग्रुपमधून काढून टाकले. यामुळे संतप्त झालेल्या अनिल व नरेशने बंटीला धमकी दिली तसेच जुना एक वाद उकरून काढला. या वादाचे पर्यवसन पुढे मारहाण आणि चाकूहल्ल्यात झाला. अनिल आणि नरेश यांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने बंटीवर चाकूहल्ला केला. यात बंटी जखमी झाला. जखमी बंटीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ‘हिल लाईन’ पोलिसांनी मुखी, रोहरा, बाबू, गायकवाड आणि बबल्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रुपमधून काढल्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनवर जीवघेणा हल्ला
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने ग्रुपमधील मेंबर्सनी अॅडमिनवर चाकूहल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.
आणखी वाचा
First published on: 30-05-2015 at 02:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp admin attacked by friend whom he removed from group