व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने ग्रुपमधील मेंबर्सनी अॅडमिनवर चाकूहल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात ग्रुप अॅडमिन बंटी कुर्सिजा जखमी झाला आहे.
उल्हासनगरमध्ये येथे बंटी गूल कुसिज्या नावाच्या कपड्याच्या व्यापाऱ्याने व्हॉटसअपवर ‘जय हो’ नावाचा ग्रुप बनवला होता. त्यामध्ये अनिल मुखी आणि नरेश रोहरा यांचादेखील समावेश होता. मात्र, ते अश्लील मेसेज, फोटो पाठवत असल्याने बंटीने त्या दोघांना ग्रुपमधून काढून टाकले. यामुळे संतप्त झालेल्या अनिल व नरेशने बंटीला धमकी दिली तसेच जुना एक वाद उकरून काढला. या वादाचे पर्यवसन पुढे मारहाण आणि चाकूहल्ल्यात झाला. अनिल आणि नरेश यांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने बंटीवर चाकूहल्ला केला. यात बंटी जखमी झाला. जखमी बंटीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ‘हिल लाईन’ पोलिसांनी मुखी, रोहरा, बाबू, गायकवाड आणि बबल्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा