मुंबई : दरडोई उत्पन्नात राज्य सहाव्या क्रमांकावर असल्याचा दावा सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र केंद्रातील मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार राज्याचा क्रमांक ११ वा असून आपण पुडूचेरीपेक्षाही मागे असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य गुंतवणुकीत तसेच विकास दरात आघाडीवर असल्याचा दावा केला. दरडोई उत्पन्नात राज्य सहाव्या क्रमांकावर असल्याच्या शिंदे यांच्या दाव्यावर चव्हाण यांनी आक्षेप घेत राज्याची घसरण होत असून आज महाराष्ट्र ११ क्रमांकावर असल्याचा दावा केला. मोदी सरकारच्या माहिती माहिती संचालनालच्या एका प्रसिद्धीपत्राचा हवाला देत चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्य ११ व्या क्रमांकावर असून पुडूचेरी सारखे राज्यही आपल्या पुढे असल्याचा टोला सरकारला लगावला. चव्हाण यांच्या या दाव्यावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. अशी कोणतेही आकडेवाही नसून राज्याच्या लोकसंख्येवरून दरडोई उत्पन्न ठरत असून दुष्काळ पडल्यास दरडोई उत्पन्न कमी होते असे फडणवीस यांनी सांगितले.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
Tanaji Sawant ON Mahayuti Government
Cabinet Expansion : मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना नेत्याचं मोठं विधान
News About Rahul Narwekar
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…”
ministerial post, west varhad, vidarbha
पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाची कुणाला ‘लॉटरी’?
Story img Loader