झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री असते पण बुद्धिवादी सोबत लोक असले की जिंकण्याची खात्री नसते असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दी आयडिया ऑफ न्यू इंडिया’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उद्योजक श्रीराम दांडेकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. भारतकुमार राऊत, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह सुरेश देवळे, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे कार्याध्यक्ष भूषण मर्दे, उपाध्यक्ष वीरभद्र दुलानी, कार्यवाह रमेश देवळे उपस्थित होते.
राष्ट्रनिर्माण करणारा १०० वर्षांचा विचार करतो. आपण राष्ट्रवादी विचारांचे आहोत. हा देश सर्वसंपन्न व्हावा, शक्तिशाली ऐश्वर्यसंपन्न व्हावा हे आपल्या सगळ्यांचे स्वप्न आहे. पण या देशात विचारशून्यात ही मोठी समस्या आहे. no one can claim he is perfect, मी सुद्धा नाही. मीही अपूर्णांक, माझेच विचार योग्य असे मी मनात नाही, असेही गडकरी म्हणाले.
मी काही इंजिनियर नाही. निर्णय न घेणं ही सध्याची मोठी समस्या आहे. आपली लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्याकडे लोकसंख्या मोठी आहे, ती एक समस्याही आहे. ज्यावेळी मुंबईतील उड्डाणपूल केले तेंव्हा वाटले होते वाहतूक समस्या सुटेल, पण गाड्या इतक्या वाढल्यात की समस्या अजूनही कायम आहे.
- काय म्हणाले गडकरी –
– दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे चे (काँक्रीट रास्ता) काम सुरू : एक लाख कोटी रुपये , १२ तासात प्रवास.
– राज्यात सात लाख कोटी रु. चे रस्ते कामे सुरू.
– भारतात १२ एक्सप्रेस वेची कामे सुरू .
– मेरठ ते दिल्ली १४ लेन हायवे : आठ तासंचा प्रवास ४० मिनिटांवर.
– भारतातून थेट मानस सरोवर जाण्यासाठी रस्त्याचे काम सुरू, जानेवारीपर्यंत उदघाटन होईल.
– मी बॉण्डच्या माध्यमातून पैसे उभे करतोय, यासाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. ५०० कोटी हवे होते तेंव्हा १०५० कोटी रु. उभे राहिले…
– स्टेट बँकेच्या अध्यक्षांनी २५ हजार कोटी रुपये गुंतवले…
– मुंबई गोवा रस्त्यावर पुढच्या वर्षी नवीन रस्त्याचे उदघाटन होईल… अर्ध्यावेळात गोवा गाठता येईल
– आमची प्राथमिकता आहे जलमार्ग, नंतर रेल्वे नंतर रस्ते आणि शेवटी हवाई मार्ग
– १११ नद्यांचे जलमार्गत रूपांतर
– रशियन सरकारच्या मदतीने नवे तंत्रज्ञान – एअर बोट – नेहमीच्या गाडीच्या किमतीत हे वाहन तयार होत आहे…
– मुंबईत साध्य वर्षाला ८० क्रूझ येतात, पुढील चार वर्षात ती संख्या ९५० वर पोहचेल.
– ठाणे-विरार जलमार्ग विकसित करण्यासाठीव १२०० कोटी रु. देतोय
– ८ लाख कोटी पैकी २ लाख कोटी शेतीत गेले पाहिजेत…
– सुप्रीम कोर्टापर्यंत भांडून इ रिक्षा आणल्यात
– मिठी नदीतून जलवाहतूक सुरू व्हावी, नदीतून निर्मल पाणी वहावे हे माझे स्वप्न आहे.
– मला विश्वास आहे, विवेकानंदांच्या स्वप्नातला विश्वागुरु भारत आपण निर्माण करू शकू.