लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : मालवण येथील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळा पुतळ्याचे बांधकाम योग्यप्रकारे केले गेले आहे की नाही याची पाहणी कोणी केली की या पाहणीविनाच पुतळ्याच्या कामासाठीचे पैसे प्रकरणातील मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला दिले गेले? पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला गेला का आणि त्याला आरोपी का केले गेले नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली. तसेच, या सगळ्याबाबत सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठासमोर बुधवारी त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, आपटे याने पुतळा उभारल्यानंतर चार महिन्यांतच तो कोसळला. यावरूनच पुतळ्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि पुतळ्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे स्पष्ट होते, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर, न्यायालयाने उपरोक्त विचारणा केली आणि सरकारी वकिलांना या सगळ्याचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले.
तत्पूर्वी, आपण केवळ शिल्पकार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना नेमकी कशी असावी याचा आरखडा आपल्याला नौदलाकडून उपलब्ध करण्यात आला होता. त्यानुसारच, पुतळ्याचे बांधकाम केल्याचा दावा आपटे याच्या वतीने वकील गणेश सोवनी यांनी केला. याशिवाय, निविदेतील अटीनुसार, पुतळ्याच्या बांधकामाकरिता लागणाऱ्या साहित्यासाठी आपटे याने ४० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचेही सोवनी यांनी न्यायालयाच्या निदर्शानास आणून दिले. त्याचप्रमाणे, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे तक्ररीत नमूद नाही. त्यामुळे, हे प्रकरण खुनाचा प्रयत्न केल्याचे नाही, तर निष्काळजीपणाचे असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.
परदेशातही पुतळे पडल्याच्या घटना
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परदेशातही पुतळे पडल्याच्या घटना घडल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. कांस्य हा हलके, स्वस्त आणि सर्व प्रकारच्या वातावरणात टिकणारा धातूप्रकार आहे. त्यामुळे, पुतळ्यांसाठी कांस्यचा वापर केला जातो, असेही सोवनी यांनी पुतळा कोसळण्याशी आपटे याचा काहीही संबंध नसल्याचा दावा करताना न्यायालयाला सांगितले. यापूर्वी, आपण नौदलासाठी कांस्य पुतळ्यांचे काम केले आहे. परंतु, नौदलाकडून आपल्या कामाबाबत कधीच तक्रार केली गेली नाही. याउलट, धातू शास्त्रांतील तांत्रिक कौशल्याबाबत काहीच माहीत नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी दुर्घटनेच्या नऊ तासांच्या आतच या प्रकरणी तक्रार नोंदवल्याचा दावा आपटे याने याचिकेत केला आहे.