मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडण्याच्या प्रकरणात मिहीर शाह हे नाव समोर आलं आहे. आरोपी मिहीर शाह हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. राजेश शाह यांना अटक करण्यात आली आहे. मिहीर शाहचा शोध मात्र पोलीस घेत आहेत. अपघातानंतर मिहीर शाह त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता ही माहिती समोर आल्याने पोलिसांनी तिचीही चौकशी केली आहे. बीएमबडब्ल्यू कारने रविवारी पहाटे नाखवा दाम्पत्याला भरधाव वेगात धडक दिली. यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. हा मिहीर शाह कोण आहे जाणून घेऊ.

मिहीर शाह कोण आहे?

मिहीर शाह हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Worli accident case, Mihir Shah , High Court ,
वरळी अपघात : मिहीर शहावर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवण्याची मागणी, उच्च न्यायालयाने घेतली दखल
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Sessions Court observation while denying bail to driver Sanjay More in Kurla BEST bus accident case Mumbai news
आरोपीच्या निष्काळजीपणामुळेच ‘बेस्ट’ अपघात; चालक संजय मोरे याला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”

मिहीरचं शिक्षण १० वीपर्यंत झालं आहे, त्याने पुढे शिक्षण घेतलेलं नाही.

राजेश शाह यांचा बांधकाम व्यवसाय आहे, याच व्यवसायात मिहीर त्यांना मदत करतो.

अपघात रविवारी पहाटे झाला, मात्र मिहीर शाहने मद्यप्राशन केलं होतं. तो आणि त्याचा चालक लाँग ड्राईव्हवर आले.

वरळीतून गोरेगावच्या दिशेने जात असताना मिहीर कार चालवत होता त्यावेळी त्याने नाखवा दाम्पत्याला धडक दिली. कावेरी नाखवा यांचा या अपघातात मृत्यू झाला.

पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानंतर आरोपीने शिवसेनेचं स्टिकर काढल्याचाही आरोप आहे.

प्रदीप नाखवा यांनीही मिहीरच अपघाताच्या वेळी कार चालवत होता असं सांगितलं आहे. तसंच प्रत्यक्षदर्शींनीही तेच सांगितलं आहे.

अपघात झाल्यापासून मिहीर फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा- Mumbai BMW Hit and Run Case: शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना अटक; अपघात प्रकरणी मुलाला मदत केल्याचा आरोप!

अपघाताच्या आधी काय काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, हीट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या चालकाला सांगितलं की आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचं आहे. प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात आला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसंच जो अपघात झाला तो एट्रिया मॉलजवळ झाला. तिथपासून त्याने कावेरी नाखवा यांना फरपटत नेलं. हा अपघात झाला तेव्हा मिहीरने मद्यप्राशन केलं होतं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

प्रदीप नाखवा यांचा आक्रोश

अपघाताचे वर्णन करत असताना नाखवा यांना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, “वरळीतील सीजे हाऊस पासून ते वरळी सी लिंकपर्यंत त्या कारने माझ्या पत्नीला फरफटत नेले. तिच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. दोन मुलांना टाकून माझी पत्नी आता गेली. आम्ही मासे विकून आमचा उदरनिर्वाह चालवतो. आता आम्ही जगायचे कसे? आज या पक्षाचे त्या पक्षाचे लोक एकमेकांवर टीका करत आहेत. पण मागून हे आरोपींनाच पाठिंबा देतात. आम्हाला कोण वाचवणार?” असा उद्विग्न प्रश्न प्रदीप नाखवा यांनी विचारला आहे.

Story img Loader