भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतीदिन. मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हा दिवस ‘दहशतवाद विरोधी दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. गांधी परिवारातील व्यक्तींनी आणि महत्त्वाच्या नेत्यांनी आज (बुधवार) नवी दिल्लीतील वीरभूमीवर जाऊन राजीव गांधींना श्रध्दांजली वाहिली. मात्र सोशल मिडियावर त्यांना श्रध्दांजली वाहताना कॉंग्रेसची थोडी गफलत झालेली दिसते.
@INCIndia या कॉंग्रेसच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवर राजीव गांधींना श्रध्दांजली वाहणारी एक पोस्ट टाकण्यात आली आहे. या पोस्टमधील छायाचित्रात राजीव गांधीनी जे वक्तव्य केलं आहे, तेच पुन्हा शब्दस्वरूपात टाकताना त्या वक्तव्याच्या पुढे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे हे वक्तव्य नक्की राजीव गांधी यांनी केले की राहुल गांधी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान नेटचावडीमध्ये राजीव गांधी यांचे असे कोणतेच वक्तव्य सापडत नाही.



१९९१ साली पेरांबुदुर येथे बॉम्बस्फोटात निवडणुक प्रचारादरम्यान त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Story img Loader