लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मराठी बहुल असलेल्या विक्रोळी मतदारसंघात कायम शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळेच मागील दोन निवडणुकीमध्ये शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) सुनील राऊत विजयश्री मिळवून विधानसभेत पोहोचले. मात्र शिवसेनेची झालेली झालेली दोन शकले आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली मनसे यामुळे विक्रोळीमधील मराठी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता आहे. मतांचे विभाजन हे नेमके कोणाला तारणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सूकता आहे.

Mumbai Exit polls
Mumbai Exit Polls Update : मुंबईत आवाज कुणाचा? महायुतीची गर्जना की मविआची डरकाळी? एक्झिट पोलचे अंदाज वाचा!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Chhagan Bhujbal On Exit Poll
Chhagan Bhujbal : एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर छगन भुजबळांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रात १०० टक्के…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
Diwali Jugaad Video how to clean diya in Diwali 2024 kitchen tips in marathi
गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Ramdas Athawale on Raj Thackeray
‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका
congress maharashtra elections 2024
लालकिल्ला: काँग्रेसचा ‘हरियाणा’ की, ‘मध्य प्रदेश’?

मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये भांडुप विधानसभा मतदारसंघातून विक्रोळी वगळण्यात आली. त्यापूर्वी भांडुप विधानसभा मतदारसंघातून २००४ वगळता आमदार म्हणून शिवसनेचे लीलाधर डाके सलग तीन वेळा निवडून आले होते. विक्रोळी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मनसेच्या पारड्यात मते टाकली आणि मनसेचे उमेदवार मंगेश सांगळे आमदार म्हणून निवडून आले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेनेचे सुनील राऊत विक्रोळी मतदारसंघातून निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीतही हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात शिवसेनेला यश आले. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) सुनील राऊत या मतदारसंघातील आमदार असले तरी पक्षाचे झालेले विभाजन, या मतदारसंघातील तीन नगरसेवकांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे) केलेला प्रवेश, विक्रोळीतील म्हाडा वसाहतीतील रहिवाशांच्या समस्या, झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींमधील वाढती लोकसंख्या अशा अनेक बाबी या निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

आणखी वाचा-सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी

शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर येथील मतदार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार संजय पाटील यांच्या पारड्यात मतदारांनी मते टाकली. त्यामुळे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार सुनील राऊत यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिवसेनेच्या विभाजनानंतर या मतदारसंघातील शिवसेनेमधील (उद्धव ठाकरे) तीन नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्याने आणि एक नगरसेवक मित्रपक्ष भाजपकडे असल्याने त्यांची ताकद वाढली आहे. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) कांजुरमार्ग येथील माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

आणखी वाचा-वांगणीतील विकासकावर ‘म्हाडा’ची कृपादृष्टी?

तसेच मनसेने विश्वजित ढोलम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी राज ठाकरे यांनी विक्रोळी मतदारसंघात जाहीर सभाही घेतली. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. त्यामुळे ढोलम यांच्या पारड्यात ही मते पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) सुनील राऊत यांना या निवडणुकीत विजय मिळवून हॅटट्रिक साधायची आहे. तर २००९ मध्ये ४२ टक्के मते घेणाऱ्या मनसेचे मताधिक्य २०१४ मध्ये १८.९८ टक्के आणि २०१९ मध्ये १२.५४ टक्क्यांनी घटले. त्यामुळे मनसेला मतदारांना पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी कसब पणाला लावावे लागणार आहेत. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) सुवर्णा करंजे यांनाही या निवडणुकीतून आपले अस्तित्त्व सिद्ध करायचे आहे. हे तिन्ही पक्ष मराठी माणसाचे प्रतिनिधित्व करणारे असल्याने या भागातील मराठी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता आहे. मात्र हे विभाजन किती प्रमाणात होते, ते कोणासाठी लाभदायक ठरते किंवा कोणासाठी त्रासदायक ठरते याबाबत उत्सुकता आहे.