विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही गोवा पोर्तुगीजा हॉटेलचे मालक सुहास अवचट यांना अटक का केली जात नाही, असा सवाल या प्रकरणातील पीडित महिलेने केला आहे. मला अवचट यांच्यासमोर आणा आणि मी उत्तरे द्यायला तयार आहे, असे आवाहनही तिने पोलिसांना केले.
सुहास अवचट यांच्यावर एका ३२ वर्षीय कॅनेडियन महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. माहीम पोलीस ठाण्यात त्यासंदर्भात ५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण अद्याप अवचट यांना अटक करण्यात आलेली नाही. सुहास अवचट यांना पोलीस ठाण्यात माझ्यासमोर उभे करा, असे मी पोलिसांना सांगितले होते. परंतु वकिलांसमवेत मी रविवारी पोलीस ठाण्यात जाऊनसुद्धा पोलिसांनी त्यांना आणले नाही, असे या तरुणीने सांगितले. पोलीस त्यांना अटक करण्यात टाळाटाळ करत आहेत, असा आरोपही तिने केला आहे.
सुहास अवचट यांना अटक का नाही?
विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही गोवा पोर्तुगीजा हॉटेलचे मालक सुहास अवचट यांना अटक का केली जात नाही, असा सवाल या प्रकरणातील पीडित महिलेने केला आहे.
First published on: 10-02-2014 at 12:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did not suhas awchat arrested in molestation